S M L
  • सुरुवात आपल्यापासून करावी - आमिर

    Published On: May 9, 2012 05:23 PM IST | Updated On: May 9, 2012 05:23 PM IST

    09 मेकोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही आपल्यापासून होते. स्त्री भ्रूण हत्येबद्दल आम्ही दाखवलं. अशा घटना आपल्या आसपास घडल्या असेल पण आपण त्या करणार नाही फक्त एवढंच करायच असतं असं मत आमिर खानने व्यक्त केलं. तसेच मी एक एन्टरटेनर आहे मला लोकांना हसवायला आवडतं,लोकांच्या मनाला स्पर्श करु वाटतं हे माझं काम आहे पण मी सामाजिक कार्यकर्ता नाही असंही आमिर म्हणाला. 'सत्यमेव जयते' कार्यक्रम प्रसारित झाल्यानंतर आज आमिर खानने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोट यांची भेट घेतली. गहलोट यांनी स्त्री भ्रूण हत्या प्रकरणी फास्ट ट्रक कोर्ट सुरु करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. आमिरने सत्यमेव जयते या कार्यक्रमातून चांगला विषय समाजासमोर आणला आहे. त्याचा हा उपक्रम अत्यंत चांगला आहे असंही गहलोट म्हणाले. गहलोट आणि आमिर खान यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.मी एक एंटरटेनर आहे ते मला चांगले जमते. मी सिनेमे बनवतो लोकांना हसवणे जमते, मला लोकांच्या भावनांना स्पर्श करु वाटतो. मला लोकांच्या मनापर्यंत पोहचायचे आहे. हा कार्यक्रम असो अथवा माझा येणार सिनेमा 'धूम 3' असो मी एक एंटरटेनर आहे पण मी सामाजिक कार्यकर्ता नाही असंही आमिरने स्पष्ट केलं.तसेच कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही आपल्यापासून होते. स्त्री भ्रूण हत्येबद्दल आम्ही दाखवलं. कोणतीही गोष्ट लोकांपर्यंत कशी पोहचते हे महत्वाचे आहे ते मी या माध्यमातून केलं आहे. स्त्री भ्रूण हत्ये सारख्या घटना आपल्या आसपास घडल्यात पण आपण त्या करणार नाही फक्त एवढंच करायचं आहे. त्यांना पकडणे, त्यांच्यावर कारवाई करणे हे पोलिसांचे, कायदाचे काम आहे हे त्यांच्यावर सोपवले पाहिजे. मला मनापासून हा कार्यक्रम करु वाटला आणि मी तो करत आहे असंही आमिर म्हणाला. रविवारी प्रदर्शित झालेल्या सत्यमेव जयते शोमध्ये स्त्री भ्रूण हत्येवर प्रकाश टाकला. याची दखल घेतं मध्यप्रदेशच्या आरोग्य मंत्रालयाने 65 गर्भनिदान केंद्रानं टाळं ठोकलंय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close