S M L
 • शरद पवार यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत

  Published On: Jun 9, 2012 05:07 PM IST | Updated On: Jun 9, 2012 05:07 PM IST

  मी भ्रष्टाचार केला असेल तर माझ्यावर खटला भरा, माझ्याविरुध्द एफआयआर दाखल करा मी त्यासाठी सामोरं जाण्यासाठी तयार आहे असं आव्हान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टीम अण्णांना दिलं. तसेच राज्यातील उद्योग प्रकल्प परराज्यात जात आहे मुळात यासाठी राज्यसरकार जबाबदार आहे सरकारमध्ये नेतृत्वगुणाचा अभाव असल्यामुळे असली नामुष्की ओढवली असल्याची टीका पवारांनी सरकारवर केली. आयबीएन लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.टीम अण्णांने मागिल महिन्यात पंतप्रधानासह 14 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला या मंत्र्यांच्या यादीत शरद पवारांवरही केजरीवाल यांनी शरसंधान साधला. टीम अण्णांच्या आरोपला सडेतोड उत्तर देत माझ्यावर खटला दाखलं करा असं आव्हान शरद पवारांनी दिलं. टीम अण्णा कोणावरही आरोप करते पण चौकशी करा अशी मागणी करते. पण साधी गोष्ट आहे आजपर्यंत अशा अनेक चौकशी झाल्यात पण हाती काही लागले नाही. देशाची न्यायालयीन प्रक्रिया सर्वश्रेष्ठ आहे त्यानुसार बोला असा सल्लाही शरद पवारांनी दिला. तसेच देशातील महागाईसंदर्भात सरकारनं योग्यवेळी निर्णय घेतला असता तर आजच्या परिस्थितीला देशाला सामोरं जावं लागलं नसतं अशा शब्दात शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली. कडू वाटणारी गोळी रोग बरा करू शकते पण सरकारनं ती गोळी घेतली नाही म्हणून रोग वाढला असंही पवार म्हणाले. राज्यातील उद्योग धंदे परराज्यात रवाना होत आहे. व्यावसायिकांना व्यवसाय करायचा आहे ज्या ठिकाणी त्यांना सोयीसुविधा भेटणार साहजिकच तो तिथे जाणार पण आपल्याकडे असं काही होतं नाही.मुळात सरकारमध्ये या व्यावसायिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची धमक नाही. सध्याचे सरकारच नाही तर मागिल काही वर्षांपासून सरकारच्या नेतृत्वगुणाला धक्का बसला आहे. पण तो कसा पुन्हा निर्माण करायचा हे महत्वाचे आहे असा सल्लावजा टोला पवारांनी सरकारला लगावला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारकिर्दीचा समाचार घेत, मुख्यमंत्र्यांनी जिल्हापातळीवर जबाबदारीने फिरले पण जबाबदारी पेक्षा स्वत:हून फिरणे महत्वाचे आहे उगाच पक्षाचा कार्यक्रम आहे म्हणून हजेरी लावणे याला काही अर्थ नाही असा सनसणीत टोला पवारांनी लगावला.

  ताज्या बातम्या

  और भी
  ibnlokmat
  close