S M L
  • नीतूच्या लग्नाची दुसरी गोष्ट

    Published On: Sep 21, 2012 01:02 PM IST | Updated On: May 13, 2013 03:48 PM IST

    एक रामपूर नावाचं गाव होतं.. त्या गावात कमी वजनाच्या एका मुलीचा जन्म झाला... तिचं नाव ठेवलं नितू..आधी सगळ्या बहिणीच असल्याने तिच्या जन्माचा उत्सव झाला नाही. ती मोठी झाली. ती शाळेत जाऊ लागली. पण मुलगी असल्याने तिला शिकवण्यात कोणाला रस नव्हता. त्यात घरात अंधश्रद्धा. एकदा नितू आजारी पडली. तिला दूर डॉक्टरकडे नेण्याएवजी तिला भोंदूबाबाकडे नेलं. तब्येत नाजूक होती. त्यात पंधरा वर्षांची असताना तिचं लग्न लावण्यात आलं. शिक्षण नाही.. स्वत:बद्दलचा आत्मविश्वास कमी त्यामुळे ती स्वत:चे निर्णय स्वता घेऊ शकली नाही. 16 वर्षांच्या आतच गरोदरपण तिच्या वाट्याला आलं. तिला कमी वजनाची मुलगी झाली. आणि वर्षभरातच तिला मुलगाही झाला. घरात आनंदोत्सव साजरा केला गेला. पण मुलगा निरोगी नव्हता. कुपोषित मुलाला धनुर्वात झाला. उपचारासाठी त्याला दवाखान्यात नेण्याऐवजी भोंदूबाबाकडे नेलं. उपचारात अपयश आलं आणि सहा महिन्यांतच त्याचा मृत्यू झाला. मानसिक आघात झालेल्या नितूवर ती पांढर्‍या पायाची आहे असं म्हणून मारहाण झाली. सहा महिन्यांतच पुन्हा नितू गरोदर राहिली. ही तिची तिसरी वेळ होती. नितूच्या गरोदरपणाची काळजी कोणीच घेतली नाही. तिला आरोग्याच्या कोणत्याही सुविधा मिळाल्या नाहीत. गावातल्या एका दाईकडे बाळंतपणासाठी तिला नेण्यात आलं. डिलेव्हरीच्या वेळी गुतागुंत निर्माण झाली. अखेर तिची आयुष्याबरोबर चाललेली झुंज संपली. नितू गेली. आणि तिचं बाळंही. जे वय लग्नासाठी योग्य समजलं जातं त्याच वयात नितूचा अंत झाला...नीतूची गोष्ट ही देशातल्या एका खेड्याची प्राथमिक गोष्ट आहे...याच गोष्टीचा वेध घेणारा हा रिपोर्ताज....

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close