S M L
  • मुंबई ड्रीम्स

    Published On: Nov 16, 2012 03:54 PM IST | Updated On: May 13, 2013 03:48 PM IST

    14 नोव्हेंबरदररोज देशभरात जवळपास 50 मुलं घरातून पळून शहरात येतात. भारतात प्रत्येक वर्षी जवळपास 10 लाख मुलं घरातून पळून जातात. दरवर्षी 1 लाख मुलं घरातून पळून जाऊन मुंबई गाठतात. घरातून पळून आलेल्या मुलांपैकी फक्त 1 टक्का मुलं घरी परततात. मुंबईतल्या आकर्षणापोटी या महानगरीत येणार्‍या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. मुंबई आपल्याला काम देईल, मुंबई आपल्याला माया देईल, या आशेपोटी लाखो मुलं मुली इथं येतात. ही मुलं आहेत शाळेत जाण्याचं जे वय असतं त्या 7 ते 14 वयोगटातली. अशा लाखो मुलांपैकीच आहेत अंबादास आणि गणेश. कामाच्या शोधात..आपल्या स्वप्नांच्या शोधात इथे येतात. या दोन मित्रांच्या स्वप्नाचं पुढे काय होतं त्याची ही कहाणी- मुंबई ड्रीम्स

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close