S M L
  • दिसली जमीन की घेतली सिंगाने -राज

    Published On: Jan 5, 2013 04:38 PM IST | Updated On: Jan 5, 2013 04:38 PM IST

    05 जानेवारीआपल्याकडे म्हण आहे 'आले अंगावर तर घेतले शिंगावर' अशीच अवस्था कोकणात झालीय. दिसली जमीन की घेतली सिंगाने, कोणीतरी कृपा शंकर सिंग जमीन लाटतो किंवा दुसरं कोणीही तरी 'सिंग' खुपसतो अशी घणाघाती टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयावर केली. तसंच कोकणात हजारो एकर जमीन परप्रांतीय लाटत आहे आणि त्यांनाच मराठी माणसंच मदत करता आणि म्हणे ग्लोबल कोकण करायचं असा खणखणीत टोलाही राज यांनी लगावला. मुंबईत भरवण्यात आलेल्या ग्लोबल कोकण महोत्सवाच्या उद्धघाटनप्रसंगी राज ठाकरे बोलत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेत हजेरी लावली आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज ठाकरे नव वर्षात फटकेबाजीला सुरूवात केलीय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close