S M L
  • कुपोषण हे मोठं आव्हान -सोनिया गांधी

    Published On: Feb 6, 2013 02:24 PM IST | Updated On: Feb 6, 2013 02:24 PM IST

    06 फेब्रुवारीबाल स्वास्थ्य योजनेची आज महाराष्ट्रातून सुरुवात झाली. पालघरमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या योजनेचं उद्घाटन केलं. बालकांचा मृत्यूदर आणि कुपोषण कमी करण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यात एकूण 1 हजार 130 स्वतंत्र तपासणी पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे. या योजनेमुळे 1 लाख 46 हजार अंगणवाडी केंद्रातल्या 77 लाख 52 हजार बालकांना लाभ होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना महाराष्ट्र राज्यातर्फे राबविण्यात येणार्‍या शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रमावर आधारित आहे. या कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वयोगटातल्या सर्व मुलांना आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. या योजनेला निधी कमी पडू देणार नाही, असं आश्वासन सोनिया यांनी यावेळी दिलं. पण महाराष्ट्रात बाल मृत्यूदर आणि कुपोषणाचं प्रमाण हे आपल्यासमोरचं मोठं आव्हान असल्याची कबुली त्यांनी दिली. यूपीए सरकार लवकरच अन्नसुरक्षा विधेयक आणणार आहे अशी घोषणाही त्यांनी केली. पालघरच्या जीवन विकास शाळेच्या पटांगणात हा कार्यक्रम होणार आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close