S M L
  • 'अशीही ग्रेट भेट'

    Published On: Feb 9, 2013 05:40 PM IST | Updated On: Jun 14, 2013 08:33 AM IST

    'ग्रेट' व्यक्तिमत्त्वांचा अचूक वेध घेणारा 'ग्रेट भेट' कार्यक्रम आता पुस्तकरुपात उपलब्ध झाला आहे. आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी समाजातल्या 25 ग्रेट व्यक्तिमत्वाच्या जीवनप्रवासाचा घेतलेला वेध या पुस्तकात वाचायला मिळेल. मुंबईतल्या रविंद्र नाट्य मंदिरात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर, आयबीएन-नेटवर्कचे मुख्य संपादक राजदीप सरदेसाई, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, शब्दभ्रमणकार रामदास पाध्ये, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या पुस्तकाची पहिली प्रत ही कॅप्टन अनिल गाडगीळ आणि कविता गाडगीळ यांना देण्यात आली. या पुस्तकरूपानं बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, अण्णा हजारे, आशा भोसले, मेधा पाटकर, सचिन तेंडुलकर, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, नाना पाटेकर, नारायण सुर्वे, विठ्ठल उमप, उज्ज्वल निकम, आमिर खान, सुधा मूर्तींपर्यंत विविध व्यक्तिमत्वांचा जीवनप्रवास आपल्याला संग्रही ठेवता येणार आहे. नव्या पिढीसाठी हा प्रेरणेचा खजिना आहे. या मुलाखती म्हणजे एक महत्त्वाचे डॉक्युमेंटेशन असून ही संपूर्णपणे व्हॅल्युएबल ग्रुपची प्रस्तुती आहे. अक्षर प्रकाशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close