S M L

नागपुरात शिवसैनिकांमध्ये हाणामारी

28 फेब्रुवारीनागपुरात राजकीय पक्षांचं धुमशान सुरूच आहे. बसपापाठोपाठ शिवसेनेमध्येही हाणामारीची घटना घडली. शिवजयंती साजरी करण्यासाठी सेनेनं एक बैठक जिल्हा कार्यालयात बोलावण्यात आली होती. या बैठकीदरम्यान शहरप्रमुख सुरज गोजे आणि जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यांच्यात वादावादी होऊन हाणामारीला सुरुवात झाली. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयावरच दगडफेक केली. तर दुसरीकडे काल नागपूरमध्ये बहुजन समाज पक्षाच्या मेळाव्यात गदारोळ झाला. असंतुष्ट कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांच्याविरुध्द नारेजाबी करत धक्काबुक्की केली. इंदोरमध्ये नवनिर्वाचित बसपाच्या नगरसेवकांचा सत्काराचा कार्यक्रम होता. त्यावेळी हा प्रकार घडला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 28, 2012 01:15 PM IST

नागपुरात शिवसैनिकांमध्ये हाणामारी

28 फेब्रुवारी

नागपुरात राजकीय पक्षांचं धुमशान सुरूच आहे. बसपापाठोपाठ शिवसेनेमध्येही हाणामारीची घटना घडली. शिवजयंती साजरी करण्यासाठी सेनेनं एक बैठक जिल्हा कार्यालयात बोलावण्यात आली होती. या बैठकीदरम्यान शहरप्रमुख सुरज गोजे आणि जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यांच्यात वादावादी होऊन हाणामारीला सुरुवात झाली. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयावरच दगडफेक केली. तर दुसरीकडे काल नागपूरमध्ये बहुजन समाज पक्षाच्या मेळाव्यात गदारोळ झाला. असंतुष्ट कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांच्याविरुध्द नारेजाबी करत धक्काबुक्की केली. इंदोरमध्ये नवनिर्वाचित बसपाच्या नगरसेवकांचा सत्काराचा कार्यक्रम होता. त्यावेळी हा प्रकार घडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 28, 2012 01:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close