S M L

पुण्यात रंगणार वसंतोत्सवाचा जलसा

23 डिसेंबर, पुणेप्राची कुलकर्णी स्वर्गीय वसंतराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ आयोजित होणारा वसंतोत्सव 9, 10 आणि 11 जानेवारी 2009 मध्ये पुण्यात रंगणार आहे. जर्मनीचा खास वाद्यवृंद, शंकर महादेवन आणि उस्ताद रशीद खान यांची जुगलबंदी अशी अनेक आकर्षणं यंदाच्या वसंतोत्सवाची आकर्षण आहेत. नवीन वर्षात रंगणा-या वसंतोत्सव महोत्सवाची पत्रकार परिषद पुण्यात झाली. वसंतोत्सवाचे संयोजक राहुल देशपांडे आणि या महोत्सवाचे निवेदक नाना पाटेकर हे दोघंही पत्रकारपरिषदेचं आकर्षण ठरले. केवळ शास्त्रीय किंवा भारतीयच नाही तर जागतिक संगितातले विविध प्रवाह रसिकांपुढे आणण्याचा प्रयत्न वसंतोत्सवातून केला जाणार आहे. वसंतोत्सवाचेआयोजक राहुल देशपांडे यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत यावर्षीच्या वसंतोत्सव महोत्सवाची माहिती दिली. वसंतोत्सवाचे संयोजक राहुल देशपांडे सांगतात, " पंच्चावन्न लोक जर्मनीहून आले आहेत. त्यांचा क्लासिकल म्युझिक, सिंफनी , मुव्हमेंट्स असा हा कार्यक्रम आहे. याशिवाय कविता कृष्णमूर्ती हेही यामध्ये गाणार आहेत. वसंतोत्सवाचं आणखी एक आकर्षण म्हणजे नाना पाटेकरांचं निवेदन. पण आपल्या निवेदनापेक्षा नानांनी यावर्षी वसंतोत्सवात गाणार्‍या लिटिल चॅम्प्सचं भरभरून कौतुक केलं. " ही मुलं गाणी अप्रतिम गात आहेत. मला स्वतःला त्यांना ऐकायचं आहे. त्यांना विचारायचंय की कसं तुम्ही इतकं चांगलं गाता ? " असं नाना पाटेकर म्हणाले. वसंतोत्सवात वसंतराव देशपांडेंची काही दुर्मीळ रेकॉर्डिंगस्‌ही यावेळी प्रकाशित केली जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 23, 2008 10:43 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 23, 2008 10:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close