S M L

मुंबई मॅरेथॉन 18 जानेवारीला होणार

23 डिसेंबर मुंबईसहाव्या मुंबई इंटरनॅशनल मॅरेथॉनचं काऊंटडाऊन आता सुरु झालंय. येत्या 18 जानेवारीला ही मॅरेथॉन होणार आहे. गेल्या महिन्यातल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पुन्हा सावरलीय. आणि या मॅरेथॉनमधून आयोजकांना हाच संदेश द्यायचाय, मुंबई किसी के लिए रुकती नही...हॉटेल ट्रायडंट 26 नोव्हेंबरला दहशतवाद्यांनी घातलेल्या थैमानानंतर महिन्याभरातच पुन्हा सुरू झालं. आणि तिथं पहिलाच कार्यक्रम झाला तो मुंबई मॅरेथॉनच्या. आयोजकांना पाठबळ मिळालंय ते मुंबईकरांच्या एकजुटीचं आणि त्यांनी दाखवलेल्या धैर्याचं. ऑगस्टमध्येच मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी 35 हजार 450 लोकांनी आपली नावं नोंदवली होती. आणि विशेष म्हणजे दहशतवादी हल्ल्यानंतरही यातल्या एकानंही आपला सहभाग काढून घेतला नाही. अगदी परदेशी स्पर्धकांनीही मोठ्या प्रमाणावर आपली नावं नोंदवली आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 23, 2008 12:11 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 23, 2008 12:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close