S M L

पुण्यात करिअर महोत्सवात 50 लाखांचा गैरव्यवहार

28 मार्चपुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचा सहल टेंडर घोटाळा ताजा असतानाच महापालिकेनं आयोजित केलेल्या युवक-करिअर महोत्सव आणि पर्यावरण महोत्सवातही गैरव्यवहार झाल्याचं उघड झालं आहे. तब्बल 50 लाखांचा हा घोटाळा आहे. करिअर तसंच पर्यावरण या क्षेत्रांशी संबंध नसलेल्या तसंच एकाच घरातल्या 3 नातेवाईकांनी स्थापन केलेल्या तीन संस्थांपैकी 2 संस्थांना नियमबाह्य पद्धतीने टेंडर देण्यात आली. कहर म्हणजे या महोत्सवादरम्यान अनेक कार्यक्रम फक्त कागदोपत्रीच होते. केवळ लाख दोन लाख रूपये थातूर-मातूर गोष्टींवर खर्च करून त्याबदल्यात तब्बल 50 लाख रूपये ढापण्याचा ठेकेदारांचा डाव उघड झाला. करिअर महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी चक्कर टाकली तर 20- 25 लोकांसमोर करियरविषयक मार्गदर्शन चाललं होतं. मार्गदर्शन महोत्सवाच्या आयोजनाशी संबंध असलेला समन्वयकच करत होता. महोत्सवस्थळी मांडलेले शैक्षणिक संस्थांचे स्टॉल्स ओस पडले होते. काही स्टॉल नावापुरतेच होते तिथं ना स्टॉल चालक होते ना माहितीपत्रकं. दररोज हजारो विद्यार्थी सहभागी होतील असं टेंडर फॉर्ममध्ये दाखवण्यात आलं होतं. करिअर महोत्सवात घोटाळाव्यक्ती विकास कार्यक्रमावरचा खर्च- 1000 युवकांसाठी एक दिवस व्यक्ती विकास मार्गदर्शन- 2 वेळेस चहा, 1 वेळचा नाष्टा- खर्च : 2 लाख 75 हजार रुपयेव्यक्ती विकास कार्यक्रमावरचा खर्च- रोजगार-व्यवसाय या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन- मानधन : 75 हजार रुपयेव्यक्ती विकास कार्यक्रमावरचा खर्च- रोजगार-व्यवसायात कशी वाढ करता येईल, यावर वक्तृत्व स्पर्धा - बक्षिसांची रक्कम : 1 लाख 50 हजार रुपयेव्यक्ती विकास कार्यक्रमावरचा खर्च- रोजगार-व्यवसाय या विषयांवरील माहितीचे किमान 30 स्टॉल उभारणे- खर्च : 3 लाख रुपयेव्यक्ती विकास कार्यक्रमावरचा खर्च- व्यसन मुक्तीवर व्याख्यान, चर्चासत्र आणि फोटो प्रदर्शन - मानधन : 1 लाख 80 हजार रुपयेपर्यावरण महोत्सव कार्यक्रमाचा खर्च- 4 ठिकाणी पर्यावरण विषयक चित्रकला स्पर्धा- बक्षीस : 5 लाख 50 हजार रुपयेपर्यावरण महोत्सव कार्यक्रमाचा खर्च- 'वॉर्मिंग ग्लोबिंग' या विषयवर व्याख्यान-चर्चासत्र, डॉक्युमेंटरी दाखवणे - खर्च : 80 हजार रुपयेपर्यावरण महोत्सव कार्यक्रमाचा खर्च- पर्यावरण डॉक्युमेंटरी दाखवणे आणि वक्तृत्व स्पर्धा- खर्च : 1 लाख 75 हजार रुपये

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 28, 2013 09:41 AM IST

पुण्यात करिअर महोत्सवात 50 लाखांचा गैरव्यवहार

28 मार्च

पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचा सहल टेंडर घोटाळा ताजा असतानाच महापालिकेनं आयोजित केलेल्या युवक-करिअर महोत्सव आणि पर्यावरण महोत्सवातही गैरव्यवहार झाल्याचं उघड झालं आहे. तब्बल 50 लाखांचा हा घोटाळा आहे. करिअर तसंच पर्यावरण या क्षेत्रांशी संबंध नसलेल्या तसंच एकाच घरातल्या 3 नातेवाईकांनी स्थापन केलेल्या तीन संस्थांपैकी 2 संस्थांना नियमबाह्य पद्धतीने टेंडर देण्यात आली. कहर म्हणजे या महोत्सवादरम्यान अनेक कार्यक्रम फक्त कागदोपत्रीच होते. केवळ लाख दोन लाख रूपये थातूर-मातूर गोष्टींवर खर्च करून त्याबदल्यात तब्बल 50 लाख रूपये ढापण्याचा ठेकेदारांचा डाव उघड झाला.

करिअर महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी चक्कर टाकली तर 20- 25 लोकांसमोर करियरविषयक मार्गदर्शन चाललं होतं. मार्गदर्शन महोत्सवाच्या आयोजनाशी संबंध असलेला समन्वयकच करत होता. महोत्सवस्थळी मांडलेले शैक्षणिक संस्थांचे स्टॉल्स ओस पडले होते. काही स्टॉल नावापुरतेच होते तिथं ना स्टॉल चालक होते ना माहितीपत्रकं. दररोज हजारो विद्यार्थी सहभागी होतील असं टेंडर फॉर्ममध्ये दाखवण्यात आलं होतं.

करिअर महोत्सवात घोटाळा

व्यक्ती विकास कार्यक्रमावरचा खर्च- 1000 युवकांसाठी एक दिवस व्यक्ती विकास मार्गदर्शन- 2 वेळेस चहा, 1 वेळचा नाष्टा- खर्च : 2 लाख 75 हजार रुपये

व्यक्ती विकास कार्यक्रमावरचा खर्च- रोजगार-व्यवसाय या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन- मानधन : 75 हजार रुपये

व्यक्ती विकास कार्यक्रमावरचा खर्च- रोजगार-व्यवसायात कशी वाढ करता येईल, यावर वक्तृत्व स्पर्धा - बक्षिसांची रक्कम : 1 लाख 50 हजार रुपये

व्यक्ती विकास कार्यक्रमावरचा खर्च- रोजगार-व्यवसाय या विषयांवरील माहितीचे किमान 30 स्टॉल उभारणे- खर्च : 3 लाख रुपये

व्यक्ती विकास कार्यक्रमावरचा खर्च- व्यसन मुक्तीवर व्याख्यान, चर्चासत्र आणि फोटो प्रदर्शन - मानधन : 1 लाख 80 हजार रुपये

पर्यावरण महोत्सव कार्यक्रमाचा खर्च- 4 ठिकाणी पर्यावरण विषयक चित्रकला स्पर्धा- बक्षीस : 5 लाख 50 हजार रुपये

पर्यावरण महोत्सव कार्यक्रमाचा खर्च- 'वॉर्मिंग ग्लोबिंग' या विषयवर व्याख्यान-चर्चासत्र, डॉक्युमेंटरी दाखवणे - खर्च : 80 हजार रुपये

पर्यावरण महोत्सव कार्यक्रमाचा खर्च- पर्यावरण डॉक्युमेंटरी दाखवणे आणि वक्तृत्व स्पर्धा- खर्च : 1 लाख 75 हजार रुपये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 28, 2013 09:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close