S M L

भाषणबंदीला मी घाबरत नाही - राज ठाकरे

25 डिसेंबर पुणेअद्वैत मेहताराज ठाकरे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमाच्यावेळी केलेल्या भाषणात आपण सरकारने लादलेल्या भाषणबंदीला घाबरत नाही असं म्हटलं आहे. जानेवारीपासून मी महाराष्ट्राचा दौरा सुरू करणार आहे. त्यावेळी ज्यांना फटकवायचं आहे त्यांना फटकवून काढणार असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच आपल्यावर कितीही केसेस टाका आपण त्याला घाबरत नाही असा इशारा त्यांनी दिला. 20 डिसेंबरपर्यंत त्यांच्यावर भाषण बंदी होती. त्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी हे जाहीर विधान केलं. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, त्यावेळी त्यांच्याविरुद्ध विरोधकांनी चालवलेल्या व्हेअर इज राज ठाकरे या कॅम्पेनचाही त्यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. आपल्या या भाषणात राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा पुन्हा लावून धरला मुंबईची वाट लागली आता पुण्याचीही वाट लागायला वेळ लागणार नाही.असा इशारा त्यांनी यावेळी पुणेकरांना दिला. 300 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी आपल्यावर समुद्रमार्गे हल्ला होऊ शकतो असं सांगितलं होतं. पण आपणं याकडे आपण दुर्लक्ष केलं. या भाषणात त्यांनी आपल्या सुरक्षा व्यवस्थेवरही टीका केली. आगामी लोकसभेच्या निवडणुका पाहता जानेवारीपासून सुरू होणारा राज ठाकरे यांचा दौरा आक्रमक असेल हे मात्र नक्कीच.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 25, 2008 03:52 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 25, 2008 03:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close