S M L

अमिताभच्या मुद्द्यावर काँग्रेसचे घूमजाव

1 एप्रिल अमिताभच्या मुद्द्यावर काँग्रेसने आज घूमजाव केले. अमिताभ यांच्याबरोबर एकाच कार्यक्रमात जायला पक्षाने कोणत्याही नेत्याला अटकाव केलेला नाही, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते शकील अहमद यांनी केला आहे. अशा प्रकारच्या बातम्यांमध्ये अतिशयोक्ती आहे. अशी मनाई कुणी केली? असा उलटा सवाल त्यांनी केला आहे. अमिताभ हे उत्तम अभिनेते आहेत, अशी प्रशंसाही त्यांनी केली आहे. काही नेते अमिताभ असलेल्या कार्यक्रमात जाऊ इच्छित नाहीत. कारण अमिताभ गुजरातचे ब्रँड ऍम्बॅसेडर आहेत. पण ज्यांना जायचे असेल, त्यांना पक्षाचा काहीच आक्षेप नाही, असेही अहमद यांनी स्पष्ट केले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2010 05:33 PM IST

अमिताभच्या मुद्द्यावर काँग्रेसचे घूमजाव

1 एप्रिल

अमिताभच्या मुद्द्यावर काँग्रेसने आज घूमजाव केले. अमिताभ यांच्याबरोबर एकाच कार्यक्रमात जायला पक्षाने कोणत्याही नेत्याला अटकाव केलेला नाही, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते शकील अहमद यांनी केला आहे.

अशा प्रकारच्या बातम्यांमध्ये अतिशयोक्ती आहे. अशी मनाई कुणी केली? असा उलटा सवाल त्यांनी केला आहे.

अमिताभ हे उत्तम अभिनेते आहेत, अशी प्रशंसाही त्यांनी केली आहे. काही नेते अमिताभ असलेल्या कार्यक्रमात जाऊ इच्छित नाहीत. कारण अमिताभ गुजरातचे ब्रँड ऍम्बॅसेडर आहेत. पण ज्यांना जायचे असेल, त्यांना पक्षाचा काहीच आक्षेप नाही, असेही अहमद यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2010 05:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close