S M L

भारत- पाक मॅचसाठी झरदारीना दिलं पंतप्रधानांनी निमंत्रण

25 मार्चवर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये आता येत्या बुधवारी भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांदरम्यान मुकाबला होणार आहे. त्यासाठी दोन्ही देशांतील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता शिगेला पोचली आहे. राजकारणी आणि नेतेमंडळीसुद्धा यात मागे नाहीत. यानिमित्ताने क्रिकेट डिप्लोमसीही सुरू झालीय. मोहालीत होणार्‍या मॅचसाठी पंतप्रधान मनमोहन सिंग स्वतः उपस्थित राहणार आहेत. इतकंच नाही तर मॅच पाहण्यासाठी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असीफ अली झरदारी आणि पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनासुद्धा त्यांनी निमंत्रण दिलं आहे. निमंत्रणाचे पत्र भारतातल्या पाकिस्तानी राजदूतांकडे देण्यात आले आहे. पाकिस्तानने या निमंत्रणाचे स्वागत केले आहे. गिलानी या मॅचसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पण झरदारी काही नियोजित कार्यक्रमामुळे झरदारी मात्र मोहालीत येऊ शकणार नाहीत असं समजतंय. पाकिस्तानी क्रिकेटप्रेमीही मोठ्या संख्येनं ही मॅच पाहण्यासाठी येणार आहेत. त्यासाठी भारताकडे मोठ्या प्रमाणात व्हिसाची मागणी होत आहे. आतापर्यंत 5 हजार व्हिसा भारत सरकारने दिले आहेत.पंतप्रधानांचं निमंत्रण'मॅचबद्दल मोठी उत्सुकता आहे आणि आम्ही सगळेजण एका रोमांचक खेळाची वाट पाहत आहोत. या मॅचमुळे खेळाचाच विजय होईल. ही मॅच पाहण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत आणि दोन्ही देशांच्या लाखो क्रिकेटप्रेमींसोबत मोहालीत यावं, असं निमंत्रण मी तुम्हाला देतो' - मनमोहन सिंगसामान्य लोकांबरोबरच नेत्यांमध्येही क्रिकेटचा फिव्हर आहे. खासदारांनी 30 तारखेचं स्पेशल प्लॅनिंग केलंय. तसेच टीम इंडियाला चीअर अपही केलंय. 30 मार्चला भारतातला दैनंदिन व्यवहार ठप्प होणार आहे. केवळ सामान्य माणूसच नाही तर नेतेसुद्धा अधीर आहेत. राजकारण नाही, आरोप प्रत्यारोप नाहीत, घोटाळे नाहीत. भारतच नव्हे तर सारं जग केवळ एकच शो पाहत असेल ती म्हणजे भारत-पाकिस्तानमधली सेमीफायनलची मॅच.दरम्यान मोहालीत होणार्‍या या मॅचसाठी पाकिस्तानची टीम चंदीगढमध्ये आज दाखल झाली आहे. या मॅचला आणखी पाच दिवसांचा अवधी असल्याने पाकिस्तानच्या टीमला सरावासाठी चांगला वेळ मिळाला आहे. दरम्यान, सेमीफायनल मॅचमध्ये भारतीय टीम फेव्हरेट असली तरी भारतीय टीमवरच अधिक दडपण असेल, असं मत पाकिस्तानचा माजी कॅप्टन इम्रान खान यानं व्यक्त केलंय. तर भारताविरुध्द दोन हात करायला टीम तयार असल्याचे कॅप्टन शाहिद आफ्रिदीनं म्हटलंय आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 25, 2011 04:16 PM IST

भारत- पाक मॅचसाठी झरदारीना दिलं पंतप्रधानांनी निमंत्रण

25 मार्च

वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये आता येत्या बुधवारी भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांदरम्यान मुकाबला होणार आहे. त्यासाठी दोन्ही देशांतील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता शिगेला पोचली आहे. राजकारणी आणि नेतेमंडळीसुद्धा यात मागे नाहीत. यानिमित्ताने क्रिकेट डिप्लोमसीही सुरू झालीय. मोहालीत होणार्‍या मॅचसाठी पंतप्रधान मनमोहन सिंग स्वतः उपस्थित राहणार आहेत. इतकंच नाही तर मॅच पाहण्यासाठी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असीफ अली झरदारी आणि पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनासुद्धा त्यांनी निमंत्रण दिलं आहे.

निमंत्रणाचे पत्र भारतातल्या पाकिस्तानी राजदूतांकडे देण्यात आले आहे. पाकिस्तानने या निमंत्रणाचे स्वागत केले आहे. गिलानी या मॅचसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पण झरदारी काही नियोजित कार्यक्रमामुळे झरदारी मात्र मोहालीत येऊ शकणार नाहीत असं समजतंय. पाकिस्तानी क्रिकेटप्रेमीही मोठ्या संख्येनं ही मॅच पाहण्यासाठी येणार आहेत. त्यासाठी भारताकडे मोठ्या प्रमाणात व्हिसाची मागणी होत आहे. आतापर्यंत 5 हजार व्हिसा भारत सरकारने दिले आहेत.

पंतप्रधानांचं निमंत्रण

'मॅचबद्दल मोठी उत्सुकता आहे आणि आम्ही सगळेजण एका रोमांचक खेळाची वाट पाहत आहोत. या मॅचमुळे खेळाचाच विजय होईल. ही मॅच पाहण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत आणि दोन्ही देशांच्या लाखो क्रिकेटप्रेमींसोबत मोहालीत यावं, असं निमंत्रण मी तुम्हाला देतो' - मनमोहन सिंग

सामान्य लोकांबरोबरच नेत्यांमध्येही क्रिकेटचा फिव्हर आहे. खासदारांनी 30 तारखेचं स्पेशल प्लॅनिंग केलंय. तसेच टीम इंडियाला चीअर अपही केलंय. 30 मार्चला भारतातला दैनंदिन व्यवहार ठप्प होणार आहे. केवळ सामान्य माणूसच नाही तर नेतेसुद्धा अधीर आहेत. राजकारण नाही, आरोप प्रत्यारोप नाहीत, घोटाळे नाहीत. भारतच नव्हे तर सारं जग केवळ एकच शो पाहत असेल ती म्हणजे भारत-पाकिस्तानमधली सेमीफायनलची मॅच.

दरम्यान मोहालीत होणार्‍या या मॅचसाठी पाकिस्तानची टीम चंदीगढमध्ये आज दाखल झाली आहे. या मॅचला आणखी पाच दिवसांचा अवधी असल्याने पाकिस्तानच्या टीमला सरावासाठी चांगला वेळ मिळाला आहे. दरम्यान, सेमीफायनल मॅचमध्ये भारतीय टीम फेव्हरेट असली तरी भारतीय टीमवरच अधिक दडपण असेल, असं मत पाकिस्तानचा माजी कॅप्टन इम्रान खान यानं व्यक्त केलंय. तर भारताविरुध्द दोन हात करायला टीम तयार असल्याचे कॅप्टन शाहिद आफ्रिदीनं म्हटलंय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2011 04:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close