S M L

पोलीस आयुक्तांनी घेतली गुन्हेगारांची बैठक

06 फेब्रुवारीमहापालिका निवडणुका शांततेत पार पडाव्यात म्हणून अमरावतीत पोलीस आयुक्तांनी वेगळाच कार्यक्रम राबवला आहे. पोलिस आयुक्तांनी चक्क शहरातील सर्व सराईत गुन्हेगारांची बैठक घेतली. या बैठकीत खून, चोर्‍या, दरोडे, खंडणीबहाद्दर, जातीय दंगली भकवणार्‍या गुन्हेगारांचा समावेश होता. यासाठी आयुक्तांनी शहरातील सराईत आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सर्व गुन्हेगारांची यादी तयार केली. आणि या 560 गुन्हेगारांना बैठकीसाठी रितसर आमंत्रण धाडलं गेलं. त्यानंतर एक मेळावाच आयुक्तांनी घेतला. यामध्ये 560 गुन्हेगारांना बोालवण्यात आलं. आयुक्तांनी या सर्वांचा क्लास घेतला. निवडणुकीच्या काळात अनुचित प्रकार झाल्यास तुम्हाला जबाबदार ठरवंल जाणार अशी तंबीच पोलीस आयुक्तांनी दिली. या बैठकीला तब्बल 500 च्या वर पुरुष आणि स्त्री गुन्हेगारांनी हजेरी लावली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 6, 2012 10:32 AM IST

पोलीस आयुक्तांनी घेतली गुन्हेगारांची बैठक

06 फेब्रुवारी

महापालिका निवडणुका शांततेत पार पडाव्यात म्हणून अमरावतीत पोलीस आयुक्तांनी वेगळाच कार्यक्रम राबवला आहे. पोलिस आयुक्तांनी चक्क शहरातील सर्व सराईत गुन्हेगारांची बैठक घेतली. या बैठकीत खून, चोर्‍या, दरोडे, खंडणीबहाद्दर, जातीय दंगली भकवणार्‍या गुन्हेगारांचा समावेश होता. यासाठी आयुक्तांनी शहरातील सराईत आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सर्व गुन्हेगारांची यादी तयार केली. आणि या 560 गुन्हेगारांना बैठकीसाठी रितसर आमंत्रण धाडलं गेलं. त्यानंतर एक मेळावाच आयुक्तांनी घेतला. यामध्ये 560 गुन्हेगारांना बोालवण्यात आलं. आयुक्तांनी या सर्वांचा क्लास घेतला. निवडणुकीच्या काळात अनुचित प्रकार झाल्यास तुम्हाला जबाबदार ठरवंल जाणार अशी तंबीच पोलीस आयुक्तांनी दिली. या बैठकीला तब्बल 500 च्या वर पुरुष आणि स्त्री गुन्हेगारांनी हजेरी लावली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 6, 2012 10:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close