S M L

मुख्यमंत्र्यांचा इशारा

9 जानेवारी ठाणेवाहतूकदार आणि तेल कंपन्यातील कर्मचा-यांच्या संपामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. एसटीबरोबरच आता रेल्वेलाही या संपाचा फटका बसण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी वर्तवली आहे. ठाणे इथल्या एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हा संप बेकायदेशीर असून, संपक-यांनी जनतेला वेठीस धरू नये, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. संपकरी अधिका-यांबरोबर होणा-या बैठकीनंतर जर त्यांनी संप मागे घेतला नाही. तर या संपात सहभागी झालेल्या प्रमुख व्यक्तींना अटक करू असा इशाराही मुख्यमंत्र्यानी दिला. संपक-यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या त्यांनी केंद्र सरकारबरोबर बोलणी करून लवकर सोडवाव्यात. उगीचचं सर्वसामान्य जनतेला वेठीस धरू नका अन्यथा कडक कारवाईला सामोरं जावं लागेल असा निर्वाणीचा सल्लाही त्यांनी दिला.दरम्यान संपावरच्या अधिका-यांना तातडीने कामावर येण्याचं आवाहन इंडियन ऑइलचे चेअरमन सार्थक बहुरिया यांनी केलं आहे. कर्मचारी कामावर हजर न झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 9, 2009 02:24 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 9, 2009 02:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close