S M L

सचिनचा सत्कार

9 जानेवारी मुंबईमुंबई क्रिकेट असोसिएशनने नव्यानं बांधलेल्या रिक्रिएशन सेंटरचं उदघाटन झालं. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा असोसिएशनच्यावतीनं सत्कार करण्यात आला. सचिनने नुकतेच टेस्ट क्रिकेटमध्ये 12,000 रन्स पूर्ण केले. त्यानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हा सत्कार करण्यात आला. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार तसंच भारतीय क्रिकेट जगतातील अनेक मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित होते. शरद पवारांच्या हस्ते सचिनला सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं. उदघाटनानंतर अनेक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं. यात सगळ्यांचं आकर्षण होतं प्रसिध्द संगीतकार ए आर रेहमान.बांद्रा-कुर्ला कॉमप्लेक्समध्ये असलेल्या एमसीएच्या इनडोअर क्रिकेट अकादमीमध्ये हे सेंटर बांधण्यात आलं आहे. जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा असलेल्या या सेंटरमधे स्नूकर, बिलियर्डस, टेनिस आणि स्क्वॉश या खेळांसाठीही इनडोअर हॉल असणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 9, 2009 06:20 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 9, 2009 06:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close