S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • रेल्वेमंत्र्यांनी महाराष्ट्रावर अन्याय केला का ?
  • रेल्वेमंत्र्यांनी महाराष्ट्रावर अन्याय केला का ?

    Published On: Feb 13, 2009 10:58 AM IST | Updated On: Feb 13, 2009 10:58 AM IST

    13 फेब्रुवारीच्या आजचा सवाल 'मध्ये चर्चा झाली ती रेल्वे बजेटवर. 13 फेब्रुवारी हा दिवस गाजला तो रेल्वे बजेटमुळं. भारतीय रेल्वेनं मंदीच्या काळातही 90 हजार कोटी रुपयांचा फायदा केला आहे, असं रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी रेल्वेबजेट वाचताना जाहीर केलं. पण या फायद्याच्या रेल्वेवर मात्र रेल्वे प्रवासी मात्र कमालीचे नाराज आहेत. रेल्वेबजेटवर जेव्हा प्रतिक्रिया घेण्यात आल्या तेव्हा ' आगामी निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून लालूंनी रेल्वेबजेट वाचलंय असं बहुतेकांनी सांगितलं. लालूंनी रेल्वेच्या तिकिटांतही कपात केली आहे. पण फक्त्त 2 टक्के. म्हणजे शंभराला दोन रूपये. त्या दिवशी रेल्वेबजेट वाचताना लालूंनी इतरही काही घोषणा केल्या होत्या. या घोषणांमधल्या बहुतेक फायद्याच्या घोषणा या पाटणा - बिहारसाठीच होत्या. मात्र त्या घोषणांमध्ये महाराष्ट्राला फारसा काहीच फायदा नव्हता. महाराष्ट्राच्या नशिबी दारुण निराशा आली. भरीस भर म्हणून मुंबईतल्या प्रवाशांच्या जखमेवर त्यांनी मीठ चोळलं. ही सगळी पार्श्वभूमी घेता ' आजचा सवाल 'चा प्रश्न होता - रेल्वेमंत्र्यांनी महाराष्ट्रावर अन्याय केला का ? ' या थेट प्रश्नानंच आजचा सवाल 'ला सुरुवात झाली आणि त्यातच संपूर्ण रेल्वे बजेटचा आढावा घेण्यात आला. भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आणि पश्चिम रेल्वेचे माजी चीफ इंजिनिअर आर. बी. आजगांवकर या नामवंत पाहुण्यांचा ' आजचा सवाल'च्या चर्चेत समावेश होता. " रेल्वेमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या नशिबी पुन्हा एकदा धोंडाच दिला आहे. आजपर्यंत एवढे रेल्वे बजेट सादर करण्यात आले पण कोणत्याही रेल्वेमंत्र्यानं फक्त् ा राम नाईक यांचा अपवाद वगळता महाराष्ट्राचा फायदा केला नाही. आगामी निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे बजेट बाचला आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी व्यक्त केलं. " महाराष्ट्राला किंवा मुंबईला रेल्वे बजेटमध्ये काहीच मिळत नाही. याला जबाबदार मुंबई तसंच महाराष्ट्राचे मंत्री, खासदार आणि आमदार आहेत. आपल्या राज्याला , आपल्या विभागाला रेल्वेची काय सुरक्षा हवी आहे. हे जापर्यंत कोणी रेल्वे मंत्र्यांच्या लक्षात आणून देत नाही तोपर्यंत महाराष्ट्राला काहीच सुरक्षा मिळणार नाही," असं किरीट सोमैया चर्चेत म्हणाले. " लालूंनी जो रेल्वे बजेट मांडलाय त्यातली गणितं काही ठीक नाहीत, असं मत आर. बी. आजगांवकर यांचं पडलं. रेल्वेमंत्र्यांनी महाराष्ट्रावर अन्याय केला का ? या ' आजचा सवाल 'वर 97 टक्के लोकांनी ' होय ' असा कौल दिला. चर्चेता शेवट करताना निखिल वागळे म्हणाले, " महाराष्ट्र आणि मुंबईवर रेल्वे मंत्र्यांनी अन्याय केला आहे. याचा जाब कोणी तरी विचारायला हवा."

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close