S M L

कॅमरॉनचा मॅनग्रोव्ह वाचवण्याचा उपक्रम

11 जानेवारी रत्नागिरीदिनेश केळुसकर समुद्री पर्यावरणाचा समतोल राखणा-या आणि पुराचा धोका कमी करणा-या कांदळ वनस्पती म्हणजेच मॅनग्रोव्ह कोकणच्या किना-यावरून झपाट्याने नष्ट होत आहेत. हा धोका ओळखून कॅमरॉन या एनजीओनं या कांदळ लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. वनविभागाकडूनही तब्बल 25 कोटीचा प्रकल्प कोकण किना-यावर राबवण्यात येणार आहे. यासाठी जागतिक बँकेकडून निधी मिळणार आहे.या उपक्रमात रत्नागिरीच्या गोगटे कॉलेजचे विद्यार्थी साखरतर खाडीकिना-यावर मॅनग्रोव्हची रोपं लावण्याचं काम करत आहेत. समुद्री जैव साखळीत या वनस्पतीला खूप महत्व आहे. पण गेल्या काही वर्षात त्यांची बेसुमार तोड झाल्यामुळे जैव साखळी धोक्यात येऊ लागली आहे. त्याशिवाय या वनस्पती नष्ट झाल्यामुळे खेकडे, कोळंबी आणि छोट्या माशांचं प्रजोत्पादनही कमी झालं आहे. वनविभागाच्या 876 चौरस किलोमीटर, तर सुमारे 1400 हेक्टर खासगी जमिनीतही अशी नैसर्गिक झाडं आहेत. हे प्रमाण वाढवण्यासाठी कांदळवने तयार करण्याचा प्रकल्प कोकण किना-यावर राबवण्यात येणार आहे.सुनामीमुळे झालेल्या हानीनंतर या मॅनग्रोव्हचं महत्त्व प्रकर्षानं जाणवलं. त्यामुळेच स्थानिकांबरोबरच सगळ्यांनीच मॅनग्रोव्ह लागवडीची आणि संरक्षणाची जबाबदारीही उचलायला हवी .

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 11, 2009 11:15 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2009 11:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close