S M L
  • सूर माझे सोबती - गायिका सुचित्रा भिडे-भागवत

    Published On: Nov 6, 2008 09:37 AM IST | Updated On: Nov 6, 2008 09:37 AM IST

    दिवसाची सुरुवात प्रसन्न झाली ती गायिका सुचित्रा भिडे - भागवत यांच्यामुळे. 'सलाम महाराष्ट्र'मध्ये त्या आल्या होत्या. 'जीवनात ही घडी अशीच राहू दे' हे भावगीत गाऊन त्यांनी गप्पांना सुरुवात केली.निरनिराळी गाणी म्हणून त्यांनी प्रेक्षकांना रिझवलंच. पण त्यांनी आतापर्यंत काय काय विशेष केलं आहे हेही सांगितलं. 'सलाम महाराष्ट्र'मध्ये त्या 'गझल'या विषयावरही बोलल्या. 'गझल'मध्ये त्यांनी मराठी गझलवर उर्दू गझलच्या असलेल्या प्रभावाबद्दल बोलल्या. 'गझल' गाताना उच्चारांचं महत्त्व त्यांनी सांगितलं. त्यांनी आशा भोसलेंची 'सलोना सा सजन हैं' आणि 'मेरे हम नफस मेरे नवा, मुझे दोस्त बनकर दगा न दे' ही बेगमअख्तर यांची गझल त्यांनी गायली. लता दीदींच्या मराठी गाण्यावर 'लताजी' नावाचा कार्यक्रम बसवला आहे. तर 'माझीया मना' हा आशा भोसलेंच्या गाण्यांवरचा कार्यक्रमही त्यांनी बसवला आहे. 'रेशीम' हा त्यांचा गझलांचा अल्बम 16 नोव्हेंबरला रिलिज होत आहे. गायिका सुचित्रा भिडे - भागवत यांनी म्हटलेली गाणी आणि गप्पा पुढील व्हिडिओवर पाहता येतील.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close