S M L
  • गप्पा दिलीप रानडेंशी (भाग - 1)

    Published On: Jan 6, 2009 04:32 AM IST | Updated On: Jan 6, 2009 04:32 AM IST

    अनेकदा आपण म्युझियम बघायला जातो. त्या संग्रहालायातल्या वस्तू इतक्या उत्तमरित्या जतन केलेल्या असतात की आपण त्या वस्तूंच्या प्रेमात पडतो. पण त्याचं श्रेय जातं ते त्या व्म्युझियमच्या क्युरेटरना. क्युरेटर म्हणजे अभिरक्षक. ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज म्युझियमचे ते सिनिअर क्युरेटर दिलीप रानडे आले होते. ते उत्तम चित्रकारही आहेत. त्यांनी ' सलाम महाराष्ट्र ' मध्ये म्युझियमविषयी आणि म्युझियमच्या कामाविषयी सांगितलं. दिलीप रानडे त्यांच्या कामाविषयी सांगतात, " मराठीत क्युरेटरला अभिरक्षक म्हणतात. क्युरेटर म्हणजे त्याच्याकडे जो विभाग असतो, त्या विभागची संपूर्ण जबाबदारी असते. जसं माझ्याकडे युरोपिअन पेंटीग्जचा संग्रह आहे. तर त्या पेंटीग्जची देखभाल करणं, रिस्टोरेशन करणं, त्या वस्तूंचे निरनिराळे संदर्भ जमा करणं, आता समजा या विषयावर प्रदर्शन भरवायचं असेल तर आपल्याकडच्या वस्तूंची विषयानुरुप म्हणजे थीमनुसार मांडणी करणं, त्याच्यावर माहितीपर लिखाण करणं हे काम क्युरेटरचं असतं. क्युरेटर जर वस्तुसंग्रहालयात काम करणारा असेल तर त्या अनुषंगानं काम करण्याची जबाबदारीही क्युरेटरची असते. म्हणजे प्रदर्शनासाठी लावलेल्या वस्तूचे डिस्प्ले सुधारणं, वस्तू नीट क्रमवार लावणं हेही काम करावं लागतं. कारण संग्रहालय पहायला येणा-या लोकांना तशी माहितीही द्यावी लागते. म्हणजे क्युरेटरची भूमिका एखाद्या वस्तूच्या पालकत्त्वापुरती मर्यादीत नसून त्या वस्तूची काळजी आणि संशोधनही तितकंच महत्त्वाचं असतं. " पण क्युरेटरचं काम आर्किओलॉजिस्ट पेक्षा थोडंसं वेगळं असतं. दिलीप रानडे सांगतात, " आर्किलॉजिस्ट उत्खननाचं काम करतात. एखाद्या वस्तूचं उत्खनन करताना भूगर्भाच्या स्तरानुसार त्या वस्तूचं वय, त्या वस्तू किती जुन्या आहेत ते शोधून काढतात. नंतर त्या वस्तूचं जतन करतात. "सलाम महाराष्ट्र ' मध्ये दिलीप रानडे यांनी म्युझियमविषयी सांगितलेली माहिती पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close