S M L

भायखळ्यातून हरवलेली असिया शेख सापडली

20 जानेवारी, मुंबई अलका धुपकरमुंबईतल्या भायखळा भागातून चोरीला गेलेली 3 वर्षांची मुलगी सापडली आहे. या मुलीचं नाव असिया शेख आहे. विक्रोळीतल्या टागोर नगरच्या नागरिकांनी या मुलीचा शोध लावलाय. ही मुलगी तीन बायकांनी चोरुन नेली होती. विक्रोळीतल्या नागरिकांना ती एका वेडसर भिकार्‍यासोबत आढळली. या मुलीच्या चेहर्‍यावरुन या लोकांना त्या भिकार्‍याबद्दल शंका आली. अधिक विचारणा करताच त्यानं तिथून पळ काढला. त्यानंतर मुंबईभरातल्या मशीदींमध्ये विचारणा करून आणि उर्दू वृत्तपत्रांमध्ये बातम्या देऊन टागोर नगरच्या या नागरिकांनी मुलीच्या पालकांचा शोध लावला. येत्या रविवारी टागोरनगरच्या नागरिकांनी शेख कुटुंबासाठी खास दावत म्हणजेच जेवणाचा कार्यक्रमही आयोजित केलाय. एकीकडे मुंबईतल्या सायन हॉस्पिटलमधून चोरीला गेलेल्या बाळाचा शोध 20 दिवसांनंतरही लागला नाही. तर दुसरीकडे मुंबईतल्या भायखळा भागातून चोरीला गेलेली 3 वर्षाची असियाा शेख मुलगी सापडली आहे. ज्युनिअर केजीत शिकणा-या असियाला तिला पळवून नेणा-यांबद्दल नीट सांगता येत नाहीये.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 20, 2009 11:37 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 20, 2009 11:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close