S M L

सचिन - भज्जीनं घेतली 26/11 तील शहिदांच्या कुटुंबियांची भेट

25 जानेवारी, हरियाणामुंबईवर झालेल्या हल्ल्यानं प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणलं. यात प्राणांची आहुती देणार्‍या शहिदांच्या कुटुंबियांच्या डोळ्यातअभिमान आणि दुख एकत्र पाहून तर अनेकांनाआपले अश्रू आवरता आले नाहीत, मग मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तरी याला अपवाद कसा राहणार ? क्रिकेट मैदानं गाजवणारे सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह या दोघांनी आयबीएन-लोकमतच्या 'हिरोज ऑफ इंडिया' या कार्यक्रमाच्या निमित्ताने हरियाणातील एनएसजी कमांडो कॅम्पला भेट दिली. यावेळी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या गजेंद्रसिंग याच्या कुटुंबियांचीही भेट घेतली. या वेळी मैदानावर तडाखेबाज फटकेबाजी करणार्‍या करणार्‍या मास्टर ब्लास्टरला शहीद झालेल्या जवानांचे धाडस ऐकुन अश्रू आवरता आले नाहीत. या वेळी सीएनएन आयबीएनची टीम आणि एनएसजीचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थीत होते. 'हिरोज ऑफ इंडिया' हा कार्यक्रम तुम्ही आयबीएन लोकमतवर 26 जानेवारी रोजी दुपारी 12, संध्याकाळी 5 आणि रात्री 9.30 वाजता पाहू शकता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 25, 2009 07:27 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 25, 2009 07:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close