S M L

भाषेच्या गैरसमजातून हल्ला झाला : मनसेची सावधगिरीची भूमिका

27 जानेवारी, नाशिक नाशिकमध्ये उत्तर भारतीयांवर केलेला हल्ला भाषेच्या गैरसमजातून झाल्याची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं घेतलीए. राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रमाच्या वेळी भोजपुरी भाषेतून गाणी सादर केली जात होती. पण ही गाणी देशहिताची असल्याचं न कळल्यानं हा प्रकार घडल्याची कबुली मनसेचे प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांनी दिलीय. तर पोलिसांनी गोंधळ घालणार्‍या पंधरा जणांना अटक केलीये. " भाषेच्या गैरसमजातून गोंधळ उडाला आहे. 26 जानेवारीच्या दिवशी हे असं व्हायला नको होतं. शहीदांचा अपमान करण्याचा मनसेचा हेतू नव्हता, असं मनसेचे प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक म्हणाले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फाडलेली आणि जाळलेली शहिदांची पोस्टर्स अस पोलिसांनी दाखविली. पोलिस आणि राज्य शासनानं याची गंभीर दखल घेतली असल्याचं मत पोलिस आयुक्त हिमांशू रॉय यांनी व्यक्त केलंय. हा हल्ला करणार्‍या 15 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर नॉन-बेलेबल कलमे लावण्यात आली आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 27, 2009 12:24 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 27, 2009 12:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close