S M L

HIVग्रस्त ड्रायव्हरला कामावर घेण्याचे कोर्टाचे आदेश

Sachin Salve | Updated On: Sep 5, 2013 10:50 PM IST

HIVग्रस्त ड्रायव्हरला कामावर घेण्याचे कोर्टाचे आदेश

hiv driver pune05 सप्टेंबर : एचआयव्ही असल्यामुळे कामावरुन काढुन टाकलेल्या पुण्यातल्या एसटी ड्रायव्हरला पुन्हा कामावर घेण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. इतकंच नाही तर या ड्रायव्हरला नुकसान भरपाई देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. आयबीएन लोकमतने या बातमीचा पाठपुरावा केला होता.

 

2008 मध्ये पुण्यातल्या या एसटी ड्रायव्हरला आपण एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं कळलं. त्यानंतर काही काळाने लांब पल्ल्याच्या गाड्यांचं ड्रायव्हिंग झेपेना म्हणून त्याने आपल्याला हलकं काम दिलं जावं अशी मागणी एसटी प्रशासनाकडे केली. एसटी प्रशासनाने त्यांना दुसरं काम तर दिलं नाहीच.

 

शिवाय आहे ते काम आणि त्याबरोबर पगार देणंही बंद केलं. यानंतर त्यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला. सामाजिक कार्यकर्ते आणि वकील असीम सरोदे यांच्या मदतीने हायकोर्टात केस दाखल झाली. आणि यानंतर त्यांना जमू शकेल असं काम द्या,इतकंच नाही तर त्यांना नुकसान भरपाईही द्या असे आदेश कोर्टाने दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2013 10:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close