S M L

कात्रज दुर्घटनेला जबाबदार राठोडची जमीन सरकारच्या ताब्यात

Sachin Salve | Updated On: Sep 10, 2013 08:34 PM IST

कात्रज दुर्घटनेला जबाबदार राठोडची जमीन सरकारच्या ताब्यात

10 सप्टेंबर : पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ शिंदेवाडी जवळ झालेल्या अपघातात दुर्घटनेला जबाबदार किसन राठोडची जमीन सरकारनं ताब्यात घेतलीय. डोंगरावर असलेली पाच एकराची जमीन सरकानं ताब्यात घेतलीय.

 

या ठिकाणी डोंगर फोडून पाण्याचा प्रवाह बदलण्यात आला होता. त्या प्रवाहात वाहून मायलेकींचा बळी गेला होता. डोंगरावर अनधिकृत रस्ता बनवल्यानं किसन राठोडला 58 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. हा दंड आकारण्यासाठी ही जमीन सरकानं लिलावात काढली होती. पण लिलावात कुणी भाग न घेतल्यानं ही जमीन सरकाराने ताब्यात घेतली जमा करण्यात आलीय.

6 जून ला शिंदेवाडी परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला होता. अतिक्रमण, रस्ते यामुळे बंद झालेले नाले आणि प्रचंड प्रमाणात झालेल्या डोंगरतोडीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी आणि राडारोडा रस्त्यावर वाहुन आला. यामध्ये विशाखा वाडेकर आणि संस्कृती वाडेकर या मायलेकींचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागं झालं. या परिसरातल्या अतिक्रमणांवर कारवाई करत प्रशासनानं डोंगरतोड करणार्‍यांवर गुन्हे दाखल केले. या प्रकाराला अनेक गोष्टी जबाबदार ठरल्या.. इथं गेल्या अनेक महिन्यांपासून रस्ता रुंदीकरणाचं काम सुरु होतं. मार्चमध्ये संपणारं हे काम लांबलं. मात्र पावसाळा तोंडावर आल्यानंतरही त्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. दुसरीकडे कात्रज बोगद्याच्या अगदी वरतीच असलेल्या टेकड्याही मोठ्या प्रमाणात फोडल्या गेल्या. याप्रकरणी टेडकीवर बांधकाम करणार्‍या सॅफ्रॉन सिटीच्या किसन राठोडवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2013 08:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close