S M L

...अन्यथा तुम्हाला दाभोलकरांकडे पाठवू,अण्णांना पुन्हा धमकीचं पत्र

Sachin Salve | Updated On: Sep 12, 2013 11:19 PM IST

Image anna_hazare_on_vilasrao_300x255.jpg12 सप्टेंबर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुन्हा एकदा धमकीचं पत्र आलंय. आमदारांच्या वेतन आणि पेन्शनवाढीविरोधात अण्णांनी जनहित याचिका दाखल करावी अशी मागणी या पत्रात करण्यात आलीय. तसंत यासंदर्भात 15 दिवसात याचिका दाखल केली नाही तर तुम्हाला नरेंद्र दाभोलकरांना भेटण्यासाठी जावं लागेल अशी जीवे मारण्याची धमकीही देण्यात आलीय.

 

धक्कादायक म्हणजे या अगोदर अण्णांना असंच एक धमकी पत्र आलं होतं. 29 ऑगस्ट रोजी राळेगणसिद्धी येथील अण्णांच्या कार्यालयात हे पत्र पाठवण्यात आलं होतं. या पत्रात अण्णांनी लोकपाल विधेयकासाठी उभारलेल्या लढ्याची आठवण करून देत काँग्रेस सरकारने 10 वर्षांपासून सत्ता भोगलीय.

 

पण देशात कुपोषण, भूकबळी गेलेत, भ्रष्टाचार बोकाळलाय गरिबांचा बळी जातोय. आता सशस्त्र क्रांतीची गरज असून यासाठी तुम्ही लढा उभा करावा अन्यथा तुमचा दाभोलकर करू अशी धमकी या पत्रात देण्यात आली होती.

या पत्रात नेमकं काय लिहण्यात आलंय?

क्रांतीसूर्य अण्णा हजारे

"आमदारांच्या पेन्शन वाढीबाबत आपण लवकरात लवकर एक जनहित याचिका दाखल करावी, नाहीतर आपल्याला 15 दिवसांच्या आत नरेंद्र दाभोलकरांना भेटण्यासाठी जावं लागेल. आपल्याला कितीही झेड सुरक्षा असली तरी आपल्यापर्यंत पोहोचायला आम्हाला वेळ लागणार नाही."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 12, 2013 02:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close