S M L

दीड लाखांसाठी आईने मुलीला विकलं

Sachin Salve | Updated On: Oct 2, 2013 04:14 PM IST

दीड लाखांसाठी आईने मुलीला विकलं

pune news02 सप्टेंबर : माता न तू वैरणी..अशी म्हणण्याची घटना पुण्यात घडलीय. फक्त दीड लाख रूपया करिता पोटच्या मुलीला दलालाच्या हातात विकल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला.या प्रकरणी चाकण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

 

पीडित मुलगी ही बीड जिल्ह्यातील परळीची रहिवाशी आहे. पीडित मुलगी सोलापूरातील एका हॉस्टेलमध्ये शिकत होती. मे महिन्यात उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलगी आपल्या घरी गेल्यावर तिच्या आईने तिला दत्ता या व्यक्तीला दीड लाख रूपयात विकले. त्यानंतर दत्ताने पीडित मुलीचा लैंगिक शोषण करून तिला पुण्यातील चाकण परिसरातील त्रिमूर्ती कला केंद्र या तमाशागृहात विकलं. तिथेही पीडित मुलीचा लैंगिक शोषण करण्यात आलं. या जाचाला कंटाळून पीडित मुलीने कसाबसा आपला जीव मुठीत धरून त्रिमूर्ती तमाशा केंद्रातून पळ काढला.

 

तिने काही सामाजिक कार्कर्त्यांची भेट घेतली आणि आपल्यावर अत्याचाराची व्यथा त्यांच्यासमोर मांडली. सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी कारवाई करत त्रिमूर्ती तमाशा केंद्राचा मालकीण संगीता, शिवा, दत्ता आणि पीडित मुलीच्या आई विरोधात गुन्हा दाखल केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 2, 2013 02:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close