S M L

पिंपरी चिंचवडमध्ये 65 हजार 500 अनधिकृत बांधकामांवर हातोडा

Sachin Salve | Updated On: Oct 5, 2013 09:09 PM IST

Image img_89032_pimpry-chinchwad_240x180.jpg05 ऑक्टोबर : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील 65 हजार 500 बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं महापालिकेला दिले आहे. जयश्री डांगे यांनी ऍड. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती सुरेश गुप्ते यांच्या खंडपीठानं हे आदेश दिलेत.

 

पवना नदीच्या पात्रामध्ये प्रतिभा महिला प्रतिष्ठानची न्यू मिलेनियम इंग्लिश स्कूल ही शाळा, एक रेस्टॉंरंट आणि दोन गॅरेज बांधण्यात आलेली आहेत. आमदार लक्ष्मण जगताप हे या प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते. जयश्री डांगे यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीत हा गैरप्रकार उघडकीस आला.त्यानंतर डांगे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

 

विशेष पिंपरी चिंचवडमधली अनधिकृत बांधकाम नियमित करण्याबाबत राज्य सरकारकडे प्रस्तव प्रलंबित असल्याची माहिती पालिकेनं दिल्यानंतर हा प्रस्ताव पाठवणंच चुकीच असल्याचं न्यायालयानं स्पष्ट करत पालिकेला कारवाईसाठी 31 डिसेंबरची मुदत दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 5, 2013 09:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close