S M L

नरेंद्र मोदींचा आज पुणे दौरा

Sachin Salve | Updated On: Nov 1, 2013 10:24 AM IST

gujrat narendra modi31 ऑक्टोबर : गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी शुक्रवारी पुण्याच्या दौर्‍यावर येत आहे. सुरुवातीला एअरपोर्टवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या दुसर्‍या टप्प्याच्या उद्घाटनाला ते उपस्थित राहणार आहेत.

त्यानंतर मंगेशकर कुटुंबीयांसमवेत ते काही काळ घालवणार आहेत. त्यानंतर तिथून गरवारे महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार्‍या औपचारिक उद्घाटन सोहळ्याला ते उपस्थित राहतील. अशी माहिती दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मेडीकल डिरेक्टर धनंजय केळकर यांनी दिलीये.

गरवारेला होणार्‍या कार्यक्रमात मोदी यांचं भाषण होणार आहे. पण हा कार्यक्रम संपुर्णपणे राजकीय नसल्याचं डॉ.केळकर यांनी सांगितलंय. या वेळी सगळ्या मंगेशकर कुटुंबीयांच्या बरोबरीनेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे उपस्थित राहतील. उद्घाटनानंतर पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरीवादनाची मैफीलसुद्धा रंगणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2013 09:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close