S M L

केजरीवालांवर विश्वास, पण माझं नाव वापरू नका -अण्णा

Sachin Salve | Updated On: Nov 19, 2013 04:01 PM IST

Image img_199662_annahazareonteamanna_240x180.jpg19 नोव्हेंबर : माझ्या नावाचा दुरूपयोग होण्याची शंका मला वाटली त्यामुळे मी अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिलं असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलंय.

अरविंद केजरीवाल हे स्वच्छ चारित्र्याचे आहेत, ते काही आपले विरोधक नाहीत, त्यांच्याशी केव्हाही चर्चेची आपली तयारी आहे असंही अण्णा म्हणाले. केजरीवाल यांनी अण्णांचा लोकपाल असा शब्द प्रयोग करू नये अशी इच्छा अण्णांनी व्यक्त केली. पैशाचा मुद्दा हा माझ्यासाठी गौण आहे असंही ते म्हणाले.

दरम्यान, अण्णांचा गैरसमज दूर केल्याचा दावा आम आदमी पार्टीचे सदस्य कुमार विश्वास यांनी केलाय. अण्णांचे पोस्टर वापरल्यावरून गैरसमज झाला होता असं विश्वास यांनी म्हटलंय. सोमवारी अण्णांच्या नावाचा गैरवापर केला म्हणून नचिकेता वाल्हेकर या तरूणांने केजरीवाल यांच्यावर काळी शाई फेकली होती. अण्णांचा केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाच्या सदस्यांनी अण्णांचा विश्वासघात केला असा आरोपही या तरूणांने केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 19, 2013 02:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close