S M L

पिंपरीत अनधिकृत बांधकामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Sachin Salve | Updated On: Nov 27, 2013 10:41 PM IST

Image img_235362_pimpari_illegal43_240x180.jpg27 नोव्हेंबर : पिंपरी-चिंचवड शहरातल्या अनधिकृत बांधकामाचा प्रश्न पुन्हा एकदा चिघळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातल्या तब्बल 43 हजार बेकायदेशीर बांधकाम धारकांकडून तिप्पट कर आकारणी करा, असे निर्देश राज्य सरकारनं दिले आहे. पण विरोधकांनी मात्र या निर्णयाला विरोध केलाय. हा निर्णय मागे घेतला नाही तर हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढण्याचा इशारा विरोधकांनी दिलाय.

शहरात तब्बल 2 लाख अनधिकृत बांधकामं आहेत. अशा बांधकामांना आळा बसावा म्हणून सरकारनं दंड म्हणून दुप्पट कर आकारण्याचे आदेश दिले होते. पण त्याची अंमलबजावणी न करता उलट असा कर वसूल करायचा नाही असा ठराव महापालिकेतल्या सत्ताधार्‍यांचा होता. पालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांनी ही गोष्ट सरकारच्या निदर्शनाला आणून दिली.

त्याचीच दखल घेत पालिका क्षेत्रातल्या 2008 नंतरच्या तब्बल 43 हजार बेकायदेशीर बांधकामधारकांकडून तिप्पट कर वसूल करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 27, 2013 10:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close