S M L

अनधिकृत घरांचा प्रश्न सुटणार ?

Samruddha Bhambure | Updated On: Dec 10, 2013 12:17 PM IST

Image img_32592_homes_240x180.jpg10 डिसेंबर : पिंपरी-चिंचवडच्या अनधिकृत घरांच्या प्रश्नाबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पुढच्या आठवड्यात या संदर्भातील विधेयक आणणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिवसेना आमदार नीलम गोर्‍हे यांनी दिली माहिती.

पिंपरी-चिंचवड परिसरातल्या अनधिकृत बांधकामांना मान्यता द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी काल राजीनामे दिले होते. विलास लांडे, अण्णा बनसोडे, बापू पठारे, लक्ष्मण जगताप या आमदारांनी आपले राजीनामे विधानसभा अध्यक्षांना दिले. या प्रकरणाबाबत लवकर निर्णय होत नसल्याची या आमदारांची तक्रार होती. दरम्यान, हा मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2013 12:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close