S M L

राष्ट्रवादीचे दबावतंत्र, 53 नगरसेवकांचे राजीनामे

Sachin Salve | Updated On: Dec 10, 2013 04:32 PM IST

राष्ट्रवादीचे दबावतंत्र, 53 नगरसेवकांचे राजीनामे

ncp pune news3410 डिसेंबर : पुणे आणि पिंपरी - चिंचवड परिसरातल्या अनधिकृत बांधकामांना मान्यता द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नेते सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आमदारांच्यापाठोपाठ आता नगरसेवकांनी राजीनामास्त्र उपसले आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या 53 नगरसेवकांनी राजीनामा दिले आहे.

आज पुणे महापालिकेतल्या राष्ट्रवादीच्या 13 नगरसेवकांनी राजीनामे दिलेत. सोमवारी सोमवारी राष्ट्रवादीचे आमदार विलास लांडे , अण्णा बनसोडे , बापू पठारे, लक्ष्मण जगताप या चार आमदारांनी आपले राजीनामे विधानसभा अध्यक्षांना दिले.

आमदारांनी राजीनामे देऊन काही तास होत नाही तेच पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या 40 नगरसेवकांनीही राजीनामे दिलेत. अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणावर लवकर निर्णय होत नसल्याची या आमदारांची तक्रार आहे. दरम्यान, हा मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याचा हा प्रकार असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, चिंचवडच्या अनधिकृत घरांच्या प्रश्नाबाबत शिवसेनेच शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. पुढच्या आठवड्यात या संदर्भातल विधेयक आणणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं अशी माहिती शिवसेना आमदार निलम गोर्‍हेंनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 10, 2013 03:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close