S M L

'आप'आणि 'स्वाभिमानी'च्या बैठकीत 'मिठाचा खडा'

Sachin Salve | Updated On: Dec 30, 2013 06:01 PM IST

'आप'आणि 'स्वाभिमानी'च्या बैठकीत 'मिठाचा खडा'

raju shetty vs anjali damaniya30 डिसेंबर : आम आदमी पार्टीने दिल्लीनंतर आता महाराष्ट्रात मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. याचाच एक भाग म्हणून पश्चिम महाराष्ट्रात शेतकर्‍यांचा 'मसिहा' म्हणून काम करणार्‍या स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आम आदमी एकत्र येण्याची चर्चा आहे. याबाबत पुण्यात बैठक होणार आहे. मात्र या बैठकीत 'मिठाचा खडा' पडलाय. आम आदमी पार्टीच्या नेत्या अंजली दमानिया यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर आरोप केलाय.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एकाच वेळी आप आणि भाजपसोबत चर्चा सुरू आहे असा दावा त्यांनी केलाय. 'आप'शी युती करणार असं भासवून स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपसोबत सीट डिलिंग करत नाहीत ना? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केलीय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून प्रस्ताव आला की युतीबाबत चर्चा करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दमानिया यांच्या आरोपांमुळे राजू शेट्टी यांनी चर्चा इथंच थांबवू असा इशारा दिलाय.

त्यामुळे आम आदमी आणि शेतकरी संघटनाची युती होण्याची शक्यता धुसर झालीय. आप बरोबर जायचं की, नाही यावर चर्चा करण्यासाठी पुण्यामध्ये ही बैठक होत आहे. आम आदमी पार्टीची ग्रामीण भागाबद्दलची आणि शेतीव्यवसायाबद्दलची भूमिका आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर आपसोबत जायचं की नाही हा निर्णय सदस्यांची मतं जाणून घेतल्यावर घेतला जाईल, असंही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आपसोबत जाण्यापूर्वी विचार करावा असा सल्ला शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 30, 2013 04:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close