S M L

अजितदादांनी जनता दरबाराला पुन्हा मारली दांडी

Sachin Salve | Updated On: Feb 6, 2014 07:36 PM IST

ajit pawar on munde06 जानेवारी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तब्येतीच कारण पुढे करत पुन्हा एकदा मुंबई इथं होणार्‍या जनता दरबाराला दांडी मारली. पण काही वेळानंतर अजित पवार यांची तब्येत अचानक सुधारली आणि ते पुण्यात शिरूर लोकसभा मतदार संघ निवडणुकीच्या मेळाव्यात हजर झाले.

या मेळाव्यात अजित पावारांनी तब्येत ठणठणीत असल्याचं उदाहरण देत आपल्या शैलीत 'ठणठणीत' भाषणही केलं. पुणे महानगरपालिकेला साडे अकरा टीएमसी ऐवजी साडे सोळा टीएमसी पाणी वाढवून देण्यास जलसंपदा विभागाने नकार दिला. मात्र हा नकार जल संपदा विभागाने दिला आहे. शासनाने दिला नाही त्यामुळे तुम्ही काळजी करू नका असं ते म्हणाले.

पण सकाळी राष्ट्रवादी भवनात होणार्‍या जनता दरबाराला दांडी मारल्यामुळे आंदोलकांचा हिरमोड झाली. निवेदनं हातात घेऊन सकाळीच जनता दरबारासाठी आलेले आंदोलक निराश होऊ घरी परतले. अजित पवारांनी काही पहिल्यांदाच जनता दरबाराला दांडी मारली नाही. मागील आठवड्यातही अजित पवारांनी दांडी मारली होती. कामासाठी धडाकेबाज भूमिका घेणारे अजित पवार कार्यक्रमांना गैरहजर राहत असल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 6, 2014 06:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close