S M L

बालग्राम संस्था बंद करण्याचे सरकारचे आदेश

Sachin Salve | Updated On: Feb 6, 2014 11:21 PM IST

बालग्राम संस्था बंद करण्याचे सरकारचे आदेश

3457 balgaram236406 फेब्रुवारी : 1979 पासून अनाथ मुलांचं घर असलेल्या येरवडा येथील बालग्राम संस्था बंद करण्याचे आदेश महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तांनी दिले आहेत. यामागे संस्था बंद करुन साडेनऊ एकर जमीन ताब्यात घेण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप होत आहे.

या निर्णयाविरोधात एसओएस बालग्रामच्या माजी मुला-मुलांनी आमरण उपोषण सुरू केलंय. फॅमिली कन्सेप्ट अंतर्गत बालग्राम संस्था चालविली जाते. गेल्या पस्तीस वर्षात गुण्यागोविंदाने भरलेल्या गोकुळात या संस्थेत 2013 मध्ये धक्कादायक घटना घडल्या त्यात 4 फेब्रुवरीत एका 6 वर्षाच्या मुलीवर संस्थेतीलच 14 वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली होती.

तर 2 ऑगस्टला 8 वर्षाच्या मुलीचा दुदैर्वी मृत्यू झाला होता. बाल न्याय अधिनियम 2000 च्या कलम 29(जी) अन्वये 7 ते 18 वयोगटातील मुलं आणि मुलींना एकत्रीत ठेवू शकत नाही अशी नोटीस संस्थेला देण्यात आली. काही दुदैर्वी घटना घडल्यानंतर संस्थेचा हलगर्जीपणाचं कारण पुढं करत आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी संस्थेची मान्यता रद्द केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 6, 2014 11:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close