S M L

परदेशींची बदली का केली ?,मुख्य सचिवांना नोटीस

Sachin Salve | Updated On: Feb 17, 2014 03:41 PM IST

9-8 pardeshi 5417 फेब्रुवारी : पिंपरी चिंचवडचे माजी आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या बदलीमागची कारणे द्या अशी नोटीस राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी मुख्य सचिवांना पाठवली आहे. श्रीकर परदेशी यांची मुदतपूर्व बदली करण्यात आली होती. राजकीय दबावापोटी ही बदली करण्यात आल्याचा आरोप केला जातोय.

आता परदेशी यांच्या बदलीमागे नेमकी काय कारणं आहेत, त्याची माहिती देण्याचे आदेश मुख्य सचिवांना देण्यात आलेत. याबाबत 28 फेब्रुवारीला मुंबई आयुक्तालयात सुनावणी होणार आहे. राज्यात एखाद्या अधिकार्‍याच्या बदलीबद्दल पहिल्यांदाच अशी कारणे मागणारी नोटीस बजावण्यात आली आहे.

07 फेब्रुवारी रोजी श्रीकर परदेशी यांची बदली करण्यात आली होती. त्यांची मुद्रांक शुल्क विभागात इन्स्पेक्टर जनरल पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलीय. परदेशींच्या जागी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी राजीव जाधव यांची नियुक्ती करण्यात आलीय. राजकीय नेत्यांना न आवडणारे निर्णय घेतल्याने त्यांची बदली केली जाईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू होती. याविरोधात पुण्यातल्या सामाजिक संघटनाही एकत्र आल्या होत्या. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परदेशींच्या बदलीचा कुठलाही प्रस्ताव नाही, असं सांगितलं होतं. तरीही त्यांची बदली करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 17, 2014 03:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close