S M L

संजूबाबा बाहेर पण अजूनही 800 कैदी रजेच्या प्रतिक्षेत

Sachin Salve | Updated On: Feb 19, 2014 08:55 PM IST

संजूबाबा बाहेर पण अजूनही 800 कैदी रजेच्या प्रतिक्षेत

jail19 फेब्रुवारी : अभिनेता संजय दत्तच्या पॅरोलवरून सध्या वाद रंगलाय. अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने संजय दत्तला 3 वर्षांची शिक्षा सुनावलीय. संजयच्या 8 महिन्यांच्या तुरुंगवासात संजयला आतापर्यंत 4 महिन्यांची रजा मिळालीय. पण, राज्यातल्या वेगवेगळ्या तुरुंगात असलेले जवळपास 800 कैदी अजूनही रजेच्या प्रतिक्षेत आहेत.

म्हणजेच या कैद्यांनी फर्लो किंवा पॅरोल यासाठी अर्ज केले आहे. पण, अजून त्यांच्या सुट्‌ट्या मंजूर झालेल्या नाही. शिक्षा लागल्यानंतर 22 महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर कैद्याला 14 दिवसांचा फर्लो म्हणजेच संचित रजा मिळते. इतकंच नाही तर कैद्यानं फर्लोसाठी अर्ज केल्यावर वेगवेगळ्या पातळ्यांवर घ्याव्या लागणार्‍या परवानग्यांमुळे तो मंजूर होण्यासाठी जवळपास 5 ते 6 महिन्यांचा कालावधी लागतो, असा सर्वसाधारण अनुभव आहे.

पण, संजय दत्तला तर तीन महिन्याच्या आतच फर्लो मिळाला. तर कैद्यावर अवलंबून असणारा कुटुंबातला एखादा सदस्य गंभीर आजारी असेल तर जी रजा मिळते त्याला पॅरोल म्हणतात. शिवाय कैद्याला वर्षातून फक्त एकदाच पॅरोल मिळतो. संजय दत्तला मात्र सलग तीन वेळा पॅरोल मिळालाय. संजय दत्त याला पुन्हा एकदा पॅरोल वाढवून दिल्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहिलंय. तर संजय दत्तला पॅरोल देताना कुठलेही नियम मोडलेलं नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलंय.

राज्यभरातल्या वेगवेगळ्या जेलमध्ये किती कैद्यांचे पॅरोलचे अर्ज प्रलंबित ?

  • नाशिक जेल - 355
  • नागपूर जेल - 64
  • औरंगाबाद जेल - 60
  • पुणे जेल - 144
  • कोकण जेल - 1
  •  नाशिक जेल - 300 कैद्यांचे फर्लोचे अर्ज प्रलंबित

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 19, 2014 08:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close