S M L

ज्येष्ठ कवी, गीतकार सुधीर मोघे यांचं निधन

Sachin Salve | Updated On: Mar 15, 2014 05:08 PM IST

ज्येष्ठ कवी, गीतकार सुधीर मोघे यांचं निधन

ज्येष्ठ कवी, गीतकार सुधीर मोघे यांचं निधन

ज्येष्ठ कवी, गीतकार सुधीर मोघे यांचं निधन

15 मार्च : 'फिटे अंधाराचे जाळे', 'सांज ये गोकुळी' अशी एकापेक्षा एक अजरामर गीतं लिहिणारे प्रख्यात कवी, गीतकार आणि संगीतकार सुधीर मोघे यांचं आज (शनिवारी) पुण्यात प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते 75 वर्षांचे होते.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मुळचे कवी असलेल्या सुधीर मोघे यांनी गीत लेखन, संगीत,दिग्दर्शन, ललित लेखन, पटकथा आणि संवाद लेखन अशा अनेक प्रांतात त्यांनी आपला ठसा उमटवला होता.

जानकी, पुढचं पाऊल, शापित, हा खेळ सावल्यांचा, कळत नकळत, चौकट राजा, आत्मविश्वास, एक डाव भुताचा, लपंडाव, सुर्याेदय अशा 50 हून अधिक सिनेमांसाठी त्यांनी गीत लेखन केलं. शांता शेळके, सुधीर फडके, श्रीधर फडके यांच्या सोबतची त्यांची गाणी विशेष गाजली.

साहित्य व संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार त्यांना चारवेळा देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 15, 2014 05:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close