S M L

दाभोलकर खून प्रकरणी दोन्ही आरोपींना जामीन

Sachin Salve | Updated On: Apr 21, 2014 08:14 PM IST

narendra dabholkar 321 एप्रिल : डॉ.नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाला रविवारी आठ महिने पूर्ण झाले पण अजूनही मुख्य आरोपी हाती लागले नाही. मात्र या प्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपींना जामीन मिळालाय.

50 हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर मनीष नागोरी आणि विकास खंडेलवालला जामीन मजूर करण्यात आला. मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल विरूद्ध चार्जशीट दाखल करण्यात पोलिसांना आलेल्या अपयशामुळे कोर्टाने या दोन्ही संशयित आरोपीना जामीन मंजूर केला.

90 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करण्यात पोलिसांना अपयश आल्याने शिवाजीनर कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केलाय. या प्रकरणात कोर्टाने पोलिसांनाही कारणे दाखवा नोटीस बजावलीय. दोन्ही आरोपींविरोधात 90 दिवसांच्या आत चार्जशीट का दाखल केली नाही, याचं स्पष्टीकरण कोर्टाने मागितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 21, 2014 08:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close