S M L

कदम, देवरा, निरुपम आणि शिरोळेंविरोधात पेड न्यूजची तक्रार

Sachin Salve | Updated On: Apr 28, 2014 10:29 PM IST

कदम, देवरा, निरुपम आणि शिरोळेंविरोधात पेड न्यूजची तक्रार

paid_news_nirupam_deora_kadam28 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात तीन टप्प्यात मतदान पार पडले पण या काळात राज्यात एकूण 70 पेड न्यूजची प्रकरणं उघड झालीय. या सगळ्या उमेदवारांनी पेड न्यूजचा खर्च हा जाहीरात खर्च म्हणून दाखवला असल्याची बाब उघड झालीय. मात्र यातली चार प्रकरणं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत.

 

भाजपचे पुण्यातील उमेदवार अनिल शिरोळे यांच्यासोबत पुण्यातलेच काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम, मुंबईतचे काँग्रेसचे उमेदवार संजय निरूपम आणि मिलिंद देवरा यांच्याविरोधात तक्रारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत. पेड न्यूज प्रकरणावर राज्य समितीने शिक्कामोर्तब केलं असून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पुढील कारवाईसाठी तक्रारी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

जर या 4 उमेदवारांच्या प्रकरणामध्ये संबंधीत उमेदवारांनी या पेड न्यूज जाहिराती म्हणून खर्च दाखवला तर हे प्रकरण निकाली निघतील. अन्यथा केंद्रीय आयोग कारवाई करू शकते. या पूर्वी वेगवेगळ्या जिल्हा समितीमार्फत पेड न्यूजचा 70 प्रकरणामध्ये नोटीसी बजावण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 28, 2014 10:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close