S M L

मोहसीन शेख हत्येप्रकरणी: हिंदू राष्ट्र सेनेच्या आणखी 6 जणांना अटक

Samruddha Bhambure | Updated On: Jun 5, 2014 06:22 PM IST

मोहसीन शेख हत्येप्रकरणी: हिंदू राष्ट्र सेनेच्या आणखी 6 जणांना अटक

05 जून :  unnamed पोलीस आता उरलेल्या संशयितांच्या शोधात आहेत. फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी सोमवारी हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोहसीनला मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. मूळचा सोलापूरचा 24 वर्षांचा मोहसीन हा आयटी क्षेत्रात तंत्रज्ञ म्हणून काम करत होता. सोमवारी तो मित्रासह नमाज पढून परत येत असताना या जमावानं त्याला गाठलं आणि मारहाण केली. याप्रकरणी आता केंद्रीय गृहमंत्रालयानं महाराष्ट्र सरकारकडून अहवाल मागवला आहे.

मोहसीन शेख मूळचा सोलापूरचा आहे. त्याच्या हत्येनं त्याच्या कुटुंबाला जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. 'आमच्या मुलाचा नाहक बळी गेला असून मारेकर्‍यांना शिक्षा झालीच पाहिजे' अशी मंागणी मोहसिनच्या वडिलांनी केली आहे. त्याचं बरोबर फेसबुक पोस्टच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. काही खोडसाळ लोक या देशाचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवू पाहतायेत. त्यामुळे निष्पापांचा बळी जातो आ लोकांची दिशाभूल करणार्‍यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशीही मागणी मोहसिनच्या वडिलांनी केली आहे.

दरम्यान, कायदा हातात घेणार्‍यांविरोधात कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर अशा पद्धतीने लाकांच्या भावना भडकावणारे मजकूर फेसबुकवर टाकणार्‍यांविरोधातही सरकारन कारवाई करावी असं ते म्हणाले. तर या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, तसंच हिंदू राष्ट्र सेनेच्या इतरही कारवायांचा तपास करणार, अशी माहिती गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिली.

कोण आहे धनंजय देसाई ?

  • हिंदू राष्ट्र सेना या मूलतत्ववादी संघटनेचा संस्थापक
  • 2007 मध्ये स्टार टीव्हीवरच्या हल्ल्यानंतर ही संघटना प्रकाशात
  • हिंदू युवतीनं मुस्लीम युवकाशी पळून जाऊन लग्न केल्याचं वृत्त दाखवल्याचा केला होता निषेध
  • धनंजय देसाईविरोधात आतापर्यंत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत 25 गुन्हे दाखल
  • यामध्ये दंगलीसंदर्भातल्या गुन्ह्यांचाही समावेश
  • मार्च 2014 मध्ये हडपसर पोलिसांनी धनंजय देसाईला शांतता भंग न करण्याची बजावली होती नोटीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 5, 2014 06:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close