S M L

मोहसीन शेख खून प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईला अटक

Samruddha Bhambure | Updated On: Jun 11, 2014 10:30 AM IST

मोहसीन शेख खून प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईला अटक

dhanajay desai11  जून : पुण्यातल्या मोहसीन शेख खून प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईला पोलिसांनी अटक केलीय. फेसबुक पोस्टच्या वादानंतर झालेल्या मारहाणीत मोहसीनचा मृत्यू झाला होता. देसाई आणि त्याच्या कार्यकर्त्यांवर मोहसीनच्या हत्येचा आरोप आहे.

धनंजय देसाईला यापूर्वीच पोलीसांनी दुसर्‍या प्रकरणांत अटक केली होती. मात्र काल संध्याकाळी त्याच्यावर मोहसीनच्या हत्येचा गुन्हा दाखल करून, रात्रीचं त्याला पुन्हा अटक करण्यात आली. आज दुपारी धनंजय देसाईला पुणे कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

फेसबुकवर महापुरुषांची बदनामी केल्यानंतर पुण्यात सोलापूरमधल्या एका तरुणाचा खून करण्यात आली होती. या प्रकरणात हिंदू राष्ट्र सेनेच्या 19 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. कोर्टाने यातील सर्व 17 आरोपींना 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर हिंदू राष्ट्र सेनेच्या कारवायांवर लगाम कसा घालता येईल यावर सरकारचा विचार चालू आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

कोण आहे धनंजय देसाई ?

  • हिंदू राष्ट्र सेना या मूलतत्ववादी संघटनेचा संस्थापक
  • 2007 मध्ये स्टार टीव्हीवरच्या हल्ल्यानंतर ही संघटना प्रकाशात
  • हिंदू युवतीनं मुस्लीम युवकाशी पळून जाऊन लग्न केल्याचं वृत्त दाखवल्याचा केला होता निषेध
  • धनंजय देसाईविरोधात आतापर्यंत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत 25 गुन्हे दाखल
  • यामध्ये दंगलीसंदर्भातल्या गुन्ह्यांचाही समावेश
  • मार्च 2014 मध्ये हडपसर पोलिसांनी धनंजय देसाईला शांतता भंग न करण्याची बजावली होती नोटीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 11, 2014 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close