S M L

आपापसातील भांडणं टाळा, कामाला लागा -उद्धव ठाकरे

Sachin Salve | Updated On: Jun 25, 2014 04:29 PM IST

आपापसातील भांडणं टाळा, कामाला लागा -उद्धव ठाकरे

1udhav_thakarey_pune25 जून : शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या आज पुण्यात मेळावा झाला. आपापसातली भांडणं टाळा आणि सरकार बनवण्याचा विचार करा, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकार्‍यांना केलं.

तसंच उद्धव यांनी या मेळाव्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. हाताला लकवा भरलेले मुख्यमंत्री निवडणुकाजवळ आल्यामुळे आता रोजच नवीन नवीन निर्णय घ्यायला लागलेत, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

तर शरद पवार गोरगरीबांच्या प्रश्नांच्या पाठपुरावा करण्याऐवजी लवासा सारख्या 26 प्रकल्पांचा पाठपुरावा करत आहेत असा टोला त्यांनी लगावला. तर शिवसैनिकांना सल्ला देताना त्यांनी आमदार होण्याचं स्वप्न बघण्यापेक्षा आपलं सरकार कसं येईल याचा विचार करायला हवा असं सल्लाही उद्धव यांनी दिला.

विधानसभेच्या तयारीचा भाग म्हणून शिवसेनेनं 'माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र' ही राज्यव्यापी मोहिमेची उद्धव यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 25, 2014 04:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close