S M L

आ.शिवतारेंचा मोर्चा पोलिसांनी माघारी पाठवला

Sachin Salve | Updated On: Jul 16, 2014 05:01 PM IST

आ.शिवतारेंचा मोर्चा पोलिसांनी माघारी पाठवला

16 जुलै : पुरंदरचे शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांना मोर्चाला परवानगी नसतानाही मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पुणे पोलिसांनी ताब्यात घेत शिवतारे आणि त्यांच्या समर्थकांची सासवडला रवानगी करण्यात आली आहे. यानंतरचं आंदोलन पुढील आठवड्यात बारामती येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानाबाहेर केलं जाईल असं शिवसेनेचे हडपसरचे आमदार महादेव बाबर यांनी जाहीर केलं.

पाण्याच्या प्रश्नासाठी सासवड ते पुणे असा हा महामोर्चा काढण्यात आला होता. आज दुपारी शिवतारेंच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा पुण्यात धडकला. हजारो लोक या मोर्चात सहभागी होते. पुरंदर तालुक्यातील शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काचं गुंजवणी धरणाचं तसंच रायता धरणाचं पाणी मिळावं, पुरंदर उपसा योजनेचं पाणी बारामतीला नेण्या आधी पुरंदर तालुक्यातील 3 गावांना पाणी मिळावं या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

आपल्या मागण्यांसदर्भात अजूनही दखल न घेतल्याने प्रशासन अथवा सरकारनं आंदोलनाची वा मागण्यांची दखल न घेतल्यानं शिवतारे यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिलाय. तर अजित पवार यांनी शिवतारे विधानसभा निवडणुकी आधी स्टेट करतायंत अशी टीका केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 16, 2014 03:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close