S M L

'ते' दोघे कोण , पुणे स्फोटाचं सीसीटीव्ही फुटेज ?

Sachin Salve | Updated On: Jul 18, 2014 06:15 PM IST

'ते' दोघे कोण , पुणे स्फोटाचं सीसीटीव्ही फुटेज ?

23pune_blast18 जुलै : पुण्यातील फरासखाना स्फोटाला गुरुवारी एक आठवडा पूर्ण झाला आहे. मात्र या स्फोटाचा सुगाव अजूनही लागलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एटीएसला संशयितांचं सीसीटीव्ही फुटेज मिळालंय.

यात दोन तरुण मोटारसायकलवरुन बाजीराव रोडवरुन आप्पा बळवंत चौक मार्गे फरासखाना रोडकडे येताना दिसत आहेत. हेच ते दोघे संशयित असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. तपासयंत्रणांनी याभोवतीच आपलं लक्ष केंद्रीत केल्याचं समजतंय.

मागील आठवड्यात गुरुवारी दगडूशेठ हलवाई मंदिराजवळ असलेल्या फरासखाना पोलीस स्टेशनच्या पार्किंगमध्ये एका दुचाकीमध्ये कमी तीव्रतेचा स्फोट झाला. या स्फोटात सहा जण किरकोळ जखमी झाले होते.

हा हल्ला दहशतवाद्यांचं कृत्य असू शकतं शक्यता गृहीत धरून त्या दिशेनं तपास केला जात आहे. मात्र आठवडा उलटला पण ठोस असा पुरावा अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 18, 2014 01:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close