S M L

माळीण गावातील दुर्घटनेत मृतांची संख्या 30 वर

Samruddha Bhambure | Updated On: Jul 31, 2014 05:37 PM IST

 माळीण गावातील दुर्घटनेत मृतांची संख्या 30 वर

malin pune new

31  जुलै : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातल्या माळीण गावावर काल संकट कोसळलं. सकाळी साडेसातच्या सुमारास डोंगराचा कडा कोसळून संपूर्ण गावच ढिगार्‍याखाली गेलं आहे. या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 30 वर गेलीय तर 150 हून जास्त लोक अजूनही ढिगार्‍याखाली अडकल्याची माहिती पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह माळीण गावातदाखल झाले आहे.  तिथल्या परिस्थितीचा आढावा घेऊन ते पंतप्रधानांशी चर्चा करणार आहेत.

आतापर्यंत 23 मृतांची ओळख पटली आहे. या संकटातून 8 जणांना सुखरूप बचावले आहेत. या दुर्घटनेतल्या जखमींवर घोडेगाव आणि आडिवले गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. या गावात 44 घरं होती. ही सर्वच घरं डोंगराचा कडा कोसळून ढिगार्‍याखाली गेली. माळीण गावाची लोकसंख्या 1150 असली तरी बरेचसे गावकरी नोकरीधंद्यानिमित्त गावाबाहेर होते, अशी माहिती खेडचे तहसीलदार प्रशांत आवटे यांनी दिली आहे.

सध्या या ठिकाणी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. एनडीआरएफ (NDRF)च्या 7 टीम बचावकार्य करत आहे. माळीण गावात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे, तसंच धुकंही पडल्यामुळे बचावकार्यात अडथळे येताहेत. त्यामुळे बचावकार्याला 3 ते 4 दिवस लागू शकतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच हर्षवर्धन पाटील आणि मधुकर पिचड यांनी घटनास्थळी भेट दिली आहे तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज माळीण गावाला भेट देणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 31, 2014 09:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close