S M L

माळीण दुर्घटनेप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल

Sachin Salve | Updated On: Jul 31, 2014 10:06 PM IST

 malin631 जुलै : पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या माळीण गावातील दुर्घटनेसंबंधी घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या दुर्घटनेसाठी कृषी विभागाकडून राबवण्यात येणार्‍या पडकई योजनेतला भ्रष्टाचार जबाबदार असल्याचा आरोप पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी केलाय.

त्यामुळे तालुका कृषी अधिकार्‍याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते सुरेश तळेकर आणि त्यांचे सहकारी धनंजय कोकणे यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात दाखल केलीय.

36 तास उलटले

दरम्यान, माळीणगावात डोंगरकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेला 36 तास लोटले आहेत. बचावकार्य अजूनही युद्धपातळीवर सुरू आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 31  जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी दिली आहे. तर 9 जणांना वाचवण्यात बचावपथकाला यश आलंय. पण माळीणगावात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहे1. या दुर्घटनेत अनेकांवर दु:खाचं डोंगर कोसळलंय. अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलंय. त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे.

शेजारील गावकरी भयभीत

माऴीण गावातल्या या दुर्घटनेनंतर आता आजुबाजूच्या गावांतल्या ग्रामस्थांमध्येही भीतीचं वातावरण पसरलंय. दररोज दिसणारे शेजारच्या माळीज गावातले गावकरी , ओळखीपाळखीचे अचानक असे डोंगरात गाडले गेल्यानंतर या गावकर्‍यांचा थरकाप उडाला आहे. उद्या जर अशी घटना आपल्यावर बेतली तर या विचाराने ग्रामस्थ भयभीत झाले आहे.

सरकारला आली जाग

 

माळीण गावातल्या दुर्घटनेनंतर सरकारला जाग आलीय. या घटनेतून धडा घेत शहरातल्या डोंगरकपारीवरच्या वस्त्यांना स्थलांतरीत करण्याचे किंवा संरक्षण भिंत बांधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संबंधीचे राज्य सरकारने सर्व महापालिकांना आदेश दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 31, 2014 09:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close