S M L

'माळीण'वर अस्मानी संकट की सुलतानी ?

Sachin Salve | Updated On: Jul 31, 2014 10:51 PM IST

malin431 जुलै : माळीण गावात दरड कोसळून जी दुर्घटना झाली ती नैसर्गिक आपत्ती होती की मानवनिर्मित असा प्रश्न आता विचारला जातोय. पडकई योजनेअंतर्गत आदिवासींना डोंगरउतारावर शेतीचे प्लॉट तयार करून दिले जातात. पण, या पडकई योजनेतल्या भ्रष्टाचाराचामुळेच माळीण दुर्घटना घडली, असं यासंदर्भात काम करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तर हा आरोप म्हणजे निव्वळ राजकारण असल्याचं विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे- पाटील स्पष्ट केलंय.

माळीणचं संकट मानवनिर्मित असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. आदिवासींसाठीच्या पडकई योजनेतला प्रचंड भ्रष्टाचारच या दुर्घटनेला कारणीभूत आहे. तेव्हा तालुका कृषी अधिकार्‍यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार पोलिसांत करण्यात आलीय.

पडकई योजनेबद्दल आक्षेप

  • - बोगस आदिवासी दाखवून कोट्यवधी रुपये लाटतात
  • - शेतीचे पट्टे बनवण्यासाठी शास्त्रोक्त पद्धत राबवली जात नाही
  • - जेसीबीसारख्या मोठ्या मशीन्सनं शेतीचे पट्टे बनवले जातात
  • - योजना राबवण्यासाठी योग्य जागेची निवड केली जात नाही
  • - अखेरच्या सात दिवसात घाईघाईनं योजना राबवली जाते

पण, या ठिकाणी पडकई योजना सुरू नव्हती. अतिवृष्टीमुळे ही घटना घडली, असं स्पष्टीकरण दिलीप वळसे-पाटील यांनी दिलंय. तर सध्या मदतीवर लक्ष देणं आवश्यक आहे, कारणमिमांसा नंतर करता येईल, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय.

हे संकट पुन्हा उद्भवू नये, यासाठी हे संकट अस्मानी का सुलतानी याची चौकशी होणं गरजेचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 31, 2014 10:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close